Home /News /pune /

Pune School updates: पुण्यात कोरोनाचा आलेख वाढताच... शाळा आणखी 8 दिवस बंदच ठेवण्याचा निर्णय, अजित पवारांची माहिती

Pune School updates: पुण्यात कोरोनाचा आलेख वाढताच... शाळा आणखी 8 दिवस बंदच ठेवण्याचा निर्णय, अजित पवारांची माहिती

उपमुख्यमंत्री अजित पवार (फाईल फोटो)

उपमुख्यमंत्री अजित पवार (फाईल फोटो)

पुण्यात कोरोना बाधितांच्या संख्येत सुरू असलेली वाढ कायम असल्याचं दिसत आहे. वाढत्या कोरोना बाधितांच्या संख्येमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

पुणे, 22 जानेवारी : राज्यातील शाळा पुन्हा सुरू (School reopen) करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असून स्थानिक पातळीवर या संदर्भात निर्णय घ्यावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, पुण्यात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं दिसत आहेत. त्यामुळे पुण्यातील शाळा (Pune School) सुरू होणार की नाही असा प्रश्न उपस्थित होत होता. यावर आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Dycm Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेणारी बैठक पार पडल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोना वाढू नये यासाठी निर्णय घेत असतो. पुण्यातील कोरोनाचा आलेख अजून आठ - 15 दिवस राहील. राज्याचा पॉझिटिव्हिटी दर 23 टक्के तर पुण्याचा 27 टक्के इतका आहे. त्यामुळे अजून आठवडाभर पुण्यातील शाळा सुरू करू नयेत असा निर्णय झाला आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करत नाही अशा दोन खासगी हॉस्पिटलबाबत तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींनंतर संबंधित हॉस्पिटलसोबत बोलणं झालं आहे. पुणे जिल्यात 1 कोटी 60 लाख लोकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. 51 टक्के लसीकरण पूर्ण झालंय, आता हा वेग वाढवणार आहोत. 60 वर्षावरील नागरिकांना शनिवारी आणि रविवारी बूस्टर डोस नक्की मिळेल असंही अजित पवार म्हणाले. वाचा : Nagpur acid attack cctv: नागपुरात महिलेवर अ‍ॅसिड हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद पर्यटन स्थळावरील छोट्या दुकानदाराना परवानगी, सिंहगड, भीमाशंकरला नागरिकांना जाता येईल. लेण्याद्री वगळता अष्टविनायक आणि भीमाशंकर दर्शन घेता येईल. कोविडमुक्त ग्राम स्पर्धेला सुरवात झाली आहे. सर्व गावांनी स्पर्धेत सहभागी व्हायला हवं. पुण्यात सर्व शाळा-महाविद्यालये बंदच राहणार पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा या संदर्भात ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं, पुण्यात सर्व शाळा-महाविद्यालये बंदच राहणार ! कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंदच ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या पालकमंत्र्यांच्या कोरोना आढावा बैठकीत घेण्यात आला. पुढील बैठकीत रुग्णसंख्येचा आढावा घेऊन याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. जलतरण तलाव सुरु ! पुणे शहरातील जलतरण तलाव सुरु करण्याचा निर्णय पालकमंत्री कोरोना संसर्ग आढावा बैठकीत घेण्यात आला असून दोन डोस घेतलेले नागरिक आणि स्पर्धांसाठी तयारी करणारे खेळाडू यांनाच जलतरण तलावात प्रवेश असणार आहे. उद्याने सकाळच्या सत्रात सुरु राहणार ! पुणे मनपा हद्दीतील उद्याने सकाळच्या सत्रात सुरू करण्याचा निर्णय आज झालेल्या पालकमंत्री कोरोना संसर्ग आढावा बैठकीत घेण्यात आला आहे. याबाबतचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Pune, School

पुढील बातम्या