JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Solapur : डॉक्टरांच्या संपामुळे आरोग्य सेवा ऑक्सिजनवर, बुधवारी होणार आणखी हाल?

Solapur : डॉक्टरांच्या संपामुळे आरोग्य सेवा ऑक्सिजनवर, बुधवारी होणार आणखी हाल?

Mard Doctors strike राज्यातील निवासी डॉक्टर (मार्ड) सध्या संपावर आहेत. या संपामुळे सोलापूरच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी येणाऱ्या पेशंट्सचे हाल होत आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सोलापूर, 3 जानेवारी : राज्यातील निवासी डॉक्टरांनी (मार्ड) वेगवेगळ्या मागण्यांसाठी सोमवारपासून संप पुकारला आहे. या संपात सोलापूर जिल्ह्यातले 400 डॉक्टर सहभागी झाल्यानं वैद्यकीय सेवांवर परिणाम झाला आहे. या प्रकरणात सरकारनं आपल्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर बुधवारपासून हा संप आणखी तीव्र करण्याचा इशारा संघटनेनं दिला आहे. संप आणखी चिघळणार? निवासी डॉक्टरांना देण्यात येणारे विद्यावेतन कायम सुरू करावे, या मागणीसाठी तसेच संसदेत राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचा (एनएमसी) कायदा मंजूर करण्यात आला, त्याला विरोध दर्शविण्यासाठी राज्यातील सोळा सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांसह रुग्णालयातील सुमारे चार हजार निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. ‘मार्ड’च्या राज्य संघटनेच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमधील मार्डच्या पदाधिकाऱ्यांसह डॉक्टर संपात सहभागी झाले आहेत. मार्ड संघटनेच्यावतीने करण्यात आलेल्या संपावर सरकारकडून काही समाधानकारक तोडगा नाही निघाला तर गुरुवारपासून अत्यावश्यक सेवा बंद करावी लागेल, असा इशारा महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर्स संघटनेचे सचिव डॉ. विकास कटारे यांनी दिला आहे. खराब अक्षराची लाज वाटतीय? अगदी सोप्या पद्धतीनं करा सुधारणा, पाहा Video निवासी डॉक्टरांच्या समस्या मुख्यमंत्री व कार्यालयास वारंवार पत्राद्वारे कळविण्यात आल्या होत्या. सरकार या समस्या गांभीर्याने घेत नसल्याने आम्हाला संपावर जाण्याचाच पर्याय उरल्याचा दावा महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर्स राज्यव्यापी संघटनेनं केला आहे.

काय आहेत प्रश्न ? 1. महाराष्ट्रातील सर्व शासकीय/ पालिका महाविद्यालयात अपुऱ्या व मोडकळीस आलेल्या वस्तीगृहामुळे विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड थांबवावी 2. वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या 1432 जागांच्या पदनिर्मितीचा प्रस्ताव सरकारकडं रखडला आहे. त्यामुळे निवासी जॉक्टरांचे भविष्य ताटकळत आहे. 3. सहयोगी आणि सहाय्यक प्राध्यापकांची अपुरी पदे तातडीने भरावी. निवासी डॉक्टरांचे आणि पदवीपूर्व वैद्यकीय विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबवावे 4. 16 ऑक्टोबर, 2018 प्रमाणे लागू झालेल्या तारखेपासून महागाई भत्ता तात्काळ अदा करण्यात यावा. 5. सध्या महाराष्ट्रातील वरीष्ठ निवासी डॉक्टरांच्या वेतनातील तफावत दूर करून सर्व वरीष्ठ निवासी डॉक्टरांना समान वेतन लागू करून राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत वरीष्ठ निवासी डॉक्टरांना न्याय द्यावा. संपाचे सोलापूरात काय परिणाम? - अतिदक्षता विभाग (ICU) वगळता अन्य सर्व विभागांमधील सेवा बंद - संपामुळे काही रुग्णालयांतील लहान शस्त्रक्रिया लांबणीवर - रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होण्याची शक्यता - सर्व रुग्णालयांमध्ये बाह्यरुग्ण विभाग सुरु ठेवण्याच्या सूचना - ओपीडीवर मात्र परिणाम जाणवू लागलाय - ऐन कोरोना संकटातच डॉक्टर संपावर - आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची शक्यता - अत्यावश्यक सेवांमधील निवासी डॉक्टरांची सेवा सुरू असल्यानं तिथल्या रूग्णसेवेवर परिणाम नाही

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या