लाडाच्या कुल्फीतून लाखोंची कमाई!

 स्पर्धा परीक्षेची तयारी करून शासकीय नोकरी मिळवावी हे स्वप्न कित्येकांचं असतं त्यासाठी अनेकजण प्रयत्न करतात. 

शासकीय नोकरी सगळ्यांनाच मिळते असे नाही. या प्रवासात काहींच्या वाट्याला अपयश हाती येत असतं तर काही सारखे अपयश आल्याने मध्येच हा मार्ग सोडून हतबल होत नैराश्याकडे वळतात. 

नागपूरच्या निकेश जांभुळकरने 100 स्पर्धा परीक्षा दिल्या मात्र, यश न आल्याने खचून न जाता एक नवा व्यवसाय थाटला. 

निकेशने नागपुरातील विसिए स्टेडियम जवळ कुल्फी चे दुकान सुरू केले असून त्यातून इतरांना रोजगार निर्माण झाला आहे. 

नागपुरात कुल्फीचा कुठलीही ब्रँड अथवा आऊटलेट नाही. त्यामुळे मी पहिले कुल्फीच्या आऊटलेट येथे सुरू केल्याच निकेश सांगतो.

इथे एकूण बारा प्रकारचे फ्लेवर असून कुल्फी व आईस्क्रीम या दोन्ही स्वरूपात आहे. 

प्रामुख्याने नागपुरातील प्रख्यात सत्रांपासून तयार केलेली ऑरेंज कुल्फी व आईस्क्रीम ही आमची वैशिष्ट्य आहे.