JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Diwali 2022: दिवाळीच्या दिवशी झटपट पण मोठी रांगोळी कशी काढणार? पाहा Video

Diwali 2022: दिवाळीच्या दिवशी झटपट पण मोठी रांगोळी कशी काढणार? पाहा Video

दिवाळीच्या दिवशी वर्षातील सर्वोत्तम रांगोळी काढण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत असतो. कमी वेळात झटपट पद्धतीने रांगोळी कशी काढायची याचे उत्तर तुम्हाला मिळणार आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

<span class="" s2""="">सोलापूर<span class="" s1""="">, 20 <span class="" s2""="">ऑक्टोबर :  <span class="" s2""="">भारतीय <span class="" s2""="">संस्कृतीत <span class="" s2""="">सण <span class="" s2""="">आणि <span class="" s2""="">त्याच्या <span class="" s2""="">संदर्भात <span class="" s2""="">असणाऱ्या <span class="" s2""="">सर्व <span class="" s2""="">परंपरेला मोठं <span class="" s2""="">महत्त्व <span class="" s2""="">आहे<span class="" s1""="">. <span class="" s2""="">दिवाळी <span class="" s2""="">म्हणलं <span class="" s2""="">की <span class="" s2""="">फटाके, <span class="" s2""="">नवीन रंगांचे आणि डिझाईनचे बाजारात येणारे कपडे, फराळाचे रुचकर पदार्थ, फटाके या गोष्टी आपल्याला लगेच आठवतात. त्याचबरोबर दिवाळी च्या निमित्तानं घराची सजावटही सर्वजण करत असतात. आपले घर सजवण्याची, सर्वांमध्ये उठून दिसावं ही प्रत्येकाची धडपड असते. दारासमोर आकर्षक रांगोळी काढली तर घरात येण्यापूर्वीच पाहुण्यांचे मन प्रसन्न होते.

भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाच्या दिवशी किंवा मंगल प्रसंगी रांगोळीला मोठं महत्त्व आहे. दिवाळीच्या दिवशी तर वर्षातील सर्वोत्तम रांगोळी काढण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत असतो. रांगोळी शिकण्याचे क्लास आता अनेक शहरांमध्ये आहेत. त्याचबरोबर पुस्तकं, सोशल मीडिया या माध्यमातूनही रांगोळी काढण्याच्या टिप्स दिल्या जातात. या दिवाळीत घरासमोर कमीत कमी वेळामध्ये आकर्षक आणि मोठी रांगोळी कशी काढायची याच्या टिप्स आम्ही तुम्हाला देणार आहोत.

सोलापूर च्या मेघना करवंदे-राहुरकर या व्यावसायिक रांगोळी कलाकार आहेत. त्यांनी गेल्या आठ वर्षांमध्ये अनेक महत्त्वाच्या प्रसंगी लक्षवेधी रांगोळ्या काढल्या आहेत. मेघना यांनी या दिवाळीनिमित्त सुमारे 30 ते 45 मिनिटांमध्ये मोठी रांगोळी कशी काढायची याचे प्रात्याक्षिक ‘News18 लोकमत’ च्या प्रेक्षकांना आणि वाचकांना करुन दाखवले आहे. त्याचबरोबर काही महत्त्वाच्या टिप्सही दिल्या आहेत.

संबंधित बातम्या

दिवाळीत जवळच्या व्यक्तींना द्या आकर्षक भेटवस्तू, पाहा मार्केटमध्ये काय आहे नवीन? Video
जाहिरात

कुठे काढणार रांगोळी?

तुमच्या <span class="" s2""="">अंगणात <span class="" s2""="">मोठी <span class="" s2""="">परसबाग <span class="" s2""="">असेल <span class="" s2""="">किंवा प्रशस्त <span class="" s2""="">जागा <span class="" s2""="">असेल <span class="" s2""="">तर <span class="" s2""="">ही <span class="" s2""="">रांगोळी <span class="" s2""="">काढण्यास <span class="" s2""="">काहीच <span class="" s2""="">हरकत <span class="" s2""="">नाही<span class="" s1""="">.   <span class="" s2""="">मेघना <span class="" s2""="">यांनी <span class="" s2""="">दिवाळीच्या निमित्तानं  <span class="" s2""="">आकाशदिवा <span class="" s2""="">आणि <span class="" s2""="">फटाके <span class="" s2""="">यांची <span class="" s2""="">सुबकता <span class="" s2""="">रांगोळीत दाखवली <span class="" s2""="">आहे <span class="" s2""="">त्याचप्रमाणे तुम्हीही तुम्हाला हव्या असलेल्या, तुम्हाला आवडणाऱ्या दिवाळीतील गोष्टी रांगोळीमधून दाखवू शकतो.  

ही सर्वांनी एकत्रपणे काढायची रांगोळी आहे. त्याचबरोबर ती मोठ्या आकाराची असल्यानं ती काढण्याचे एक खास तंत्र आहे. उभे राहून आणि कमरेत वाकून पाचही बोटातून रांगोळी सोडण्याचे हे तंत्र आहे. या पद्धतीनं रांगळी वेगानं काढता येते. त्यामुळे ही ‘वेगवान रांगोळी’ या नावानंही प्रसिद्ध आहे.

जाहिरात
लक्ष्मीपुजनात मानाचे स्थान असणारी केरसुणी कशी बनते? पाहा Video

कोणते साहित्य हवे?

<span class="" s2""="">‘या रांगोळीसाठी  <span class="" s2""="">पावडर <span class="" s2""="">प्रकारातील <span class="" s2""="">विविध <span class="" s2""="">रंग<span class="" s1""="">, <span class="" s2""="">हळद<span class="" s1""="">, <span class="" s2""="">कुंकू<span class="" s1""="">, <span class="" s2""="">गुलाल  यांचा <span class="" s2""="">वापर <span class="" s2""="">चाळणीने <span class="" s2""="">चाळून <span class="" s2""="">केला <span class="" s2""="">जातो<span class="" s1""="">. <span class="" s2""="">सुरुवातीला <span class="" s2""="">अपेक्षित <span class="" s2""="">डिझाइनचे <span class="" s2""="">मार्किंग <span class="" s2""="">करून <span class="" s2""="">त्यात <span class="" s2""="">रंग <span class="" s2""="">भरत <span class="" s2""="">जायचा आणि <span class="" s2""="">क्रमाक्रमाने <span class="" s2""="">पांढऱ्याशुभ्र <span class="" s2""="">रांगोळी <span class="" s2""="">पावडरने <span class="" s2""="">सांस्कृतिक <span class="" s2""="">प्रतिकांचे <span class="" s2""="">आकार <span class="" s2""="">काढून <span class="" s2""="">डिझाइन <span class="" s2""="">पूर्ण <span class="" s2""="">करायचे,’ अशी ही रांगोळी काढण्याची पद्धत असल्याचे मेघना यांनी सांगितले.  

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या