file photo
यवतमाळ, 18 जुलै: यवतमाळ जिल्ह्याच्या पांढरकवडा तालुक्यातील दातपडी याठिकाणी एका विवाहित महिलेला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे नणंदेनंच अंगावर रॉकेल टाकून वहिनीला जिवंत जाळलं आहे. या दुर्दैवी घटनेच वहिनी तब्बल 80 टक्के भाजल्या असून उपचारादरम्यानं त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. याप्रकरणी मृत महिलेच्या नातेवाईकांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पांढरकवडा पोलीस करत आहेत. मोनिका गणेश पवार असं मृत महिलेचं नाव आहे. 4 जुलै रोजी मोनिका यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. त्यांना एक चार वर्षांचा मुलगा देखील आहे. पण मोनिका यांनी दुसऱ्या वेळी मुलीला जन्म दिल्यानं, आता माहेरी आपल्या लेकीचा लाड कोण करणार या भावनेतून नणंदेनं आपल्या वहिनीला धुसफूस करायला सुरुवात केली. त्यामुळे दोघांत वादही झाला. या वादातून आरोपी नणंदने आपल्या वहिनीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जिवंत जाळलं आहे. हेही वाचा- आधी बेदम मारहाण, मग धारदार शस्त्रानं तोडले तरुणाचे हात; कारण ऐकून बसेल धक्का ही घटना घडल्यानंतर घरातील इतर नातेवाईकांनी मोनिकाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण त्या 80 टक्के भाजल्यानं त्यांची प्रकृती गंभीर होती. उपचारादरम्यान मोनिका यांची प्राणज्योत मालवली आहे. याप्रकरणी मृत महिलेच्या नातेवाईकांनी आरोपी नणंद कांता संजय राठोड हिच्याविरुद्ध पांढरकवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. हेही वाचा- आइसक्रीम देण्याच्या बहाण्यानं चिमुकलीला बोलावलं अन्…; 28 वर्षीय आरोपीला अटक पांढरकवडा पोलिसांनी 302 कलामांर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी नातेवाईकांची चौकशी केली असता, भावालाही मुलगी झाली, त्यामुळे आता माहेरी आपल्या लेकीचे लाड कोण करणार? या भावनेतून नणंदेनंच वहिनीला जाळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेचा पुढील तपास पांढरकवडा पोलीस करत आहेत.