shraddha walker murder case
मुंबई 09 डिसेंबर : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या श्रद्धा हत्याकांडाने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. दरम्यान नुकतंच श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मेघदूत या शासकिय निवासस्थानी ही भेट झाली असून भेटीच्या वेळी किरिट सोमय्या आणि श्रद्धाचे कुटुंबीय उपस्थित होते. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. Shraddha Murder Case: ‘सप्टेंबरमध्ये आफताबला कॉल केला, त्याने सांगितलं की श्रद्धा..’, वडील विकास वालकर यांचा खुलासा विकास वालकर म्हणाले, की माझी मुलगी श्रद्धाबाबात मी मनोगत व्यक्त करतो. दिल्ली राज्यपाल आणि दिल्ली पोलिसांनी असं सांगितलं आहे, की न्याय मिळवून देऊ . देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं आहे. नीलम गोऱ्हे, सोमय्या यांनी घरी येऊन चौकशी केली.सोमय्या यांनी दिल्लीला विमान प्रवास, राहण्याचा खर्च केला, यासाठी सगळ्यांचे आभार मानतो, असं ते म्हणाले. वसई पोलिसांवर आरोप - वसई येथील माणिपूर पोलीस स्टेशनच्या असहकार्यामुळे मला बराच त्रास झाला. तसं झालं नसतं तर माझी मुलगी जिवंत असती, त्यामुळे याची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. ते म्हणाले, की माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आणि राहील. आफताब पुनावालाला कठोर शिक्षा करा. आफताबच्या कुटुंबीयांची सखोल चौकशी करा. या कटामध्ये अन्य कुणी सहभागी असतील तर त्यांचीही चौकशी करून शिक्षा व्हावी, अशी मागणी करतो. मी पहिल्यापासूनच याच्या विरोधात होतो श्रद्धा घरी का येऊ शकले नाही? याचा शोध व्हायला पाहिजे. तिच्यावर कोणाचा दबाव होता? अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली. पुढे ते म्हणाले, की श्रद्धाने २०१९ रोजी केलेल्या तक्रारीबाबात मला काही माहीती नव्हती . २०२१ मध्ये श्रद्धा बरोबर बोलणे झाले होते, तेव्हा तिने सांगितले की, मी बंगळुरूमध्ये राहते. डेटिंग ॲपमधून जी मैत्री होते, यावर विचार करण्यात यावा. पालकसुद्धा या बाबतीत काही; करू शकत नाहीत . मी पहिल्यापासूनच याच्या विरोधात होतो, असंही ते म्हणाले.