JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / धक्कादायक! अचानक होऊ लागले मोरांचे मृत्यू, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

धक्कादायक! अचानक होऊ लागले मोरांचे मृत्यू, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

जिल्हा प्रशासन मोरांचे मृत्यू रोखण्यासाठी ठोस पावले उचलत नसल्याचा आरोप परिसरातील ग्रामस्थांनी केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बीड, 23 जानेवारी : दोन दिवसापासून बीड जिल्ह्यात मोरांच्या मृत्यूचं सत्र सुरू झालं असून ते थांबता थांबत नसल्याचं चित्र आहे. शुक्रवारी सकाळी शिरूर कासार तालुक्यातील लोणी शिवारात मृतावस्थेत पाच मोर आढळून आले होते. शनिवारी दुपारी चार वाजता पुन्हा लोणी शिवारातच एका ज्वारीच्या शेतात 5 मोर मृतावस्थेत आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सलग दोन दिवस मोरांचे मृत्यू होत असल्याने ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे. असे असताना देखील बीड जिल्हा प्रशासन मोरांचे मृत्यू रोखण्यासाठी ठोस पावले उचलत नसल्याचा आरोप परिसरातील ग्रामस्थांनी केला आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा -शिरूर कासार तालुक्‍यात लोणी-वारणी शिवारात मोरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. जवळच आशिया खंडातील सर्वात मोठे मयूर अभयारण्य नायगाव आहे. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात मोरांचा वावर असतो. मात्र मागील काही दिवसापासून बीड जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’ची साथ असल्याने अनेक ठिकाणी पक्षांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. धक्कादायक म्हणजे मागील दोन दिवसात बीड जिल्ह्यात 10 मोरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हेही वाचा - ‘नाय म्हणजे नाय’, कोंबड्या घेऊन जात असताना चिमुरडा ढसाढसा रडला, VIDEO लोणी शिवारात आज दुपारी चार वाजता पुन्हा एका ज्वारीच्या शेतामध्ये पाच मोर मृतावस्थेत आढळून आल्याने येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. मोरांचे होत असलेल्या मृत्यू संदर्भाने जिल्हा प्रशासनाने तात्काळ योग्य ती कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या