नरेंद्र मते (प्रतिनिधी), वर्धा, 8 ऑगस्ट: वर्धा जिल्ह्यातील पुलगावलगत एका वस्तीत राहणाऱ्या अल्पवयीन बालिकेवर तीन दिवसांपूर्वी बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी उघडकीस आली. या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून गुरूवारी रात्री ही घटना घडल्याचे समोर आलं आहे. हेही वाचा… विंग कमांडर दीपक साठे यांच्या निवासस्थानी गृहमंत्र्यांची भेट, आई-वडिलांचं केलं सांत्वन पुलगाव शहरापासून काही अंतरावर असलेल्या वसाहतीत पीडितेचे कुटुंब वास्तव्यास आहे. कुटुंबाशी परिचीत असलेल्याच तिघांनी या बालिकेला गुरूवारी रात्री घरी कोणी नसताना तिला उचलून जवळच्या जंगलात नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. बालिकेनं घरी आल्यावर ही बाब सांगितली. मात्र आई-वडिलांनी समाजाच्या धाकाने या घटनेची कुठे वाच्यता केली नाही. मात्र, या वस्तीशी संबंधित देवळी येथील एका युवकाने सामाजिक कार्यकर्त्याशी संपर्क साधून त्यांना या घटनेची माहिती दिली. यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. सामाजिक कार्यकर्त्याने शनिवारी वस्तीला भेट देवून पीडित कुटुंबाशी संवाद साधला. त्यावेळी हा संतपाजनक प्रकार उघड आला. सदर कुटुंब पोलिसांकडे भीतीपोटी जायला तयार नव्हतं. त्यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांने त्यांचे समुपदेशन करत तक्रार करण्यास त्यांना तयार केले. यानंतर तात्काळ पुलगाव पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल करण्यात आली. पीडित कुटुंबानं आरोपींबाबत माहितीही दिली. हेही वाचा… वडापाव सेंटरमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट; एकाचा होरपळून मृत्यू, पाहा LIVE VIDEO उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव यांनी या प्रकरणात तक्रार दाखल झाल्यानंतर दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. तसेच पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवल्याची माहिती दिली. या प्रकरणी पुलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.