JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मुलीनेच जगासमोर आणलं संजय राऊतांचं अनोखं रुप, फेसबुकवर शेअर केला VIDEO

मुलीनेच जगासमोर आणलं संजय राऊतांचं अनोखं रुप, फेसबुकवर शेअर केला VIDEO

शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी तुम्ही एरव्ही विरोधकांवर कडाडून टीका करताना पाहिले असेल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 मार्च: शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी तुम्ही एरव्ही विरोधकांवर कडाडून टीका करताना पाहिले असेल. मात्र, संजय राऊत यांची कन्या पुर्वशी राऊत हिने तिच्या वडिलांचएक अनोखं रुप जगासमोर आणलं आहे. पुर्वशीने आपल्या फेसबूक अकाऊंटवर वडिलांचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात संजय राऊत चक्क पेटी वाजवताना दिसत आहे. ‘सामना’चे संपादक म्हणून, शिवसेना नेता म्हणून संजय राऊत केवळ फटकारे मारतात असा एक गैरसमज आहे. ते रूक्ष असावे असे अनेकदा अनेकांनी म्हटले आहे. पण ते तसे नाहीत. ते राजकारणापलीकडे वाचतात , ऐकतात आणि बोलतात, असंही पुर्वशी हिने म्हटले आहे. हेही वाचा.. ‘मी आज काही बंद करायला आलेलो नाही’ , मुख्यमंत्र्यांनी केली सहकार्याची अपेक्षा काय आहे पुर्वशीची फेसबुक पोस्ट..

‘सामना’चा संपादक म्हणून, शिवसेना नेता म्हणून तो फक्त फटकारे मारतो असा एक गैरसमज आहे. तो रूक्ष असावा असे अनेकदा अनेकांनी म्हटले आहे. पण तो तसा नाही. तो राजकारणा पलीकडे वाचतो , ऐकतो आणि बोलतो. तो आजही सैगल , बेगम अख्तर , चंद्रू आत्मा ऐकतो.. ऐकताना गुणगुणतो….ते गुणगुणणे मनापासून असते. तो मूडमध्ये असला की त्याची बोटे टेबलावर तालात थिरकतात.. आज खुप वर्षांनी तो सक्तीने घरी होता. त्याचे रेग्युलर वाचन आणि लिखाण आटोपल्यावर त्याने त्याची लाडकी पेटी बाहेर काढली..ती स्वतः साफ केली… आणि आजची आमची संध्याकाळ संगीतमय करून टाकली. हेही वाचा.. ‘चला मावळ्यांनो…’, संभाजीराजेंनी दिला कोरोनाला हरवण्याचा मंत्र

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या