JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ...मग आमच्यासोबत युती का केली? चंद्रकांत खैरेंचा फडणवीसांवर पलटवार

...मग आमच्यासोबत युती का केली? चंद्रकांत खैरेंचा फडणवीसांवर पलटवार

मुंबई, 23 जानेवारी : आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी केली जात आहे. सर्वच राजकीय पक्षाकडून बाळासाहेबांना आदरांजली वाहिली जात आहे. ‘विचारांशी नातं हे बाळासाहेबांशी खरं नातं आहे. जो जो विचारांशी नातं सांगेल, तोच खरा बाळासाहेबांचा अनुयायी असेल’ असं म्हणत भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. यावरुन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, जर असं होत मग आमच्या सोबत युती का केली?

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 जानेवारी : आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी केली जात आहे. सर्वच राजकीय पक्षाकडून बाळासाहेबांना आदरांजली वाहिली जात आहे. ‘विचारांशी नातं हे बाळासाहेबांशी खरं नातं आहे. जो जो विचारांशी नातं सांगेल, तोच खरा बाळासाहेबांचा अनुयायी असेल’ असं म्हणत भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. यावरुन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, जर असं होत मग आमच्या सोबत युती का केली? आमच्या सोबत सत्तेत होते तेव्हा त्यांना नाही ही गोष्ट आठवली, असा जोरदार टोला त्यांनी फडणवीस यांना लगावला आहे. तसेच ते म्हणाले की, सकाळपासून एक व्हिडिओ सोशल मीडियावर फिरतो आहे. यामध्ये गद्दारांना तुडवा, साहेबांनी सुद्धा सांगितले की, गद्दारांना माफी नाही. आनंद दिघे यांच्या धर्मवीर चित्रपटात सुद्धा सांगितले की, गद्दारांना माफी करून देऊ नका. त्यामुळे या गद्दारांना माफी नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा वाईट वाटत असेल. ज्या प्रकारे ज्या शिवसेनेला त्यांनी तयार केलं त्या शिवसेनेत अशा प्रकारची फूट पाडली. भाजपने या शिवसेनेत फूट पाडली आहे. पैसे देऊन ही फूट पाडली, असा आरोप खैरे यांनी केला. हेही वाचा -  …तोच खरा बाळासाहेबांचा अनुयायी, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच राहतील - आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाचं काय होणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची मुदत 23 जानेवारीला संपणार आहे. यावरही खैरै यांनी आपली प्रतिक्रिया दिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच राहतील, असा विश्वासही खैरे यांनी व्यक्त केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या