JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / निवडणूक आयोगाने दिलं नवं नाव, बाळासाहेबांच्या त्या फोटोसह एकनाथ शिंदेंची पहिली रिएक्शन

निवडणूक आयोगाने दिलं नवं नाव, बाळासाहेबांच्या त्या फोटोसह एकनाथ शिंदेंची पहिली रिएक्शन

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातल्या वादामुळे निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं, तसंच दोन्ही गटांना वेगवेगळी नावं दिली आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 ऑक्टोबर : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातल्या वादामुळे निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं, तसंच दोन्ही गटांना वेगवेगळी नावं दिली आहेत. उद्धव ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आलं आहे. ठाकरे गटाला मशाल हे निवडणूक चिन्ह मिळालं आहे, पण निवडणूक आयोगाने शिंदे गटाला अजून चिन्ह दिलेलं नाही. निवडणूक आयोगाने त्रिशूळ आणि गदा ही दोन्ही चिन्ह बाद केली आहेत. त्रिशूळाची शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटाकडून मागणी करण्यात आली होती. धार्मिक चिन्ह असल्यानं निवडणूक आयोगाने त्रिशूळ आणि गदा ही दोन्ही चिन्ह बाद केली आहेत. शिंदे गटाला निवडणूक आयोगाकडून नव्याने तीन चिन्ह द्यायला सांगण्यात आली आहेत. शिंदेंची पहिली प्रतिक्रिया शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा अखेर विजय. आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार…, असं ट्वीट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. या ट्वीटसोबत एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा स्वत:चा फोटोही शेअर केला आहे.

संबंधित बातम्या

अंधेरीमध्ये पहिली लढाई अंधेरीची पोटनिवडणूक जाहीर झाल्यामुळे निवडणूक आयोगाने तातडीने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीमध्ये ठाकरे गट उमेदवार उतरवणार आहे, तर शिंदे गट ही निवडणूक लढणार का नाही, हे अजून निश्चित झालेलं नाही. भाजपकडून मुरजी पटेल यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाण्याची शक्यता आहे. भाजपच्या या उमेदवाराला शिंदे गट पाठिंबा देऊ शकतो. अंधेरी पूर्वची ही पोटनिवडणूक उद्धव ठाकरे यांच्यासाठी शिंदेंच्या बंडानंतरची पहिली लढाई असेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या