JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / देशभरातील 17 पक्षांच्या बैठकीत शिवसेनेची रोखठोक भूमिका, ईडी आणि सीबीआयची केली तक्रार

देशभरातील 17 पक्षांच्या बैठकीत शिवसेनेची रोखठोक भूमिका, ईडी आणि सीबीआयची केली तक्रार

शिवसेनेच्या खासदारांनी सर्वपक्षीय नेत्यांकडे ईडी, सीबीआय सारख्या यंत्रणांबद्दल तक्रार केली.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

प्रशांत लिला रामदास, प्रतिनिधी नवी दिल्ली, 17 जुलै : शिवसेनेच्या अनेक लोकप्रतिनिधींवर ईडी आणि सीबीआयकडून कारवाई करण्यात आली. अनेकांच्या घरावर छापे टाकण्यात आले. शिवसेनेचे अर्जुन खोतकर, संजय राऊत, प्रताप सरनाईक, अनिल परब, भावना गवळी, आनंदराव अडसूळ अशा अनेक नेते आणि त्यांच्या कुटुंबियांवर ईडीने कारवाई केली. ईडी आणि सीबीआयच्या या कारवाईवर शिवसेनेकडून अनेकदा संताप आणि नाराजी व्यक्त करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना नेत्यांनी केंद्रीय यंत्रणांबाबतची आपली खदखद सर्व विरोधी पक्षांच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांपुढे दिल्लीत मांडली. उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी आज विरोधी पक्षांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील ‘6 जनपथ’ या निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी देण्याचं निश्चित झालं. या बैठकीत उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी निश्चित करण्यासोबतच राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा झाली. या बैठकीसाठी देशभरातून 17 पक्षांचे प्रतिनिधी गेले होते. महाराष्ट्राच्या शिवसेना पक्षातून खासदार संजय राऊत आणि विनायक राऊत गेले होते. यावेळी शिवसेनेच्या खासदारांनी सर्वपक्षीय नेत्यांकडे ईडी, सीबीआय सारख्या यंत्रणांबद्दल तक्रार करण्यात आली. तपास यंत्रणांच्या वापराबाबत शिवसेनेने नाराजी व्यक्त केली. भाजप विरहित सरकार पाडण्यासाठी या यंत्रणांचा वापर होतोय, असा दावा शिवसेनेकडून करण्यात आला. केंद्रीय यंत्रणांकडून सुरु असलेल्या कारवाईवरुन नाराजी व्यक्त करण्यात आली. ( ‘एकदा नव्हे तर लाखवेळा गद्दार म्हणेन, हिम्मत असेल तर…’; शिवसेनेच्या रणरागिणीचं संतोष बांगरांना खुलं आव्हान ) दरम्यान, या बैठकीनंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी UPA च्या उमेदवाराची घोषणा केली. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी UPA कडून मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी देण्यात आली असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली. “आम्ही आज अनेक विरोधी पक्षातील नेत्यांची चर्चा केली. विरोधी पक्षाच्या वतीने एक उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मार्गरेट अल्वा यांना उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याचं सर्वानुमते ठरलं आहे. मार्गारेट अल्वा यांनी राज्यपाल, खासदार आणि महाराष्ट्राच्या प्रभारी म्हणून देखील काम केले आहे. सर्व विरोधी पक्षानी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. आज उपस्थित सर्व पक्षानी त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. अरविंद केजरीवाल आणि ममता बॅनर्जी यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. येत्या मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.यावेळी सर्व विरोधी पक्ष उपस्थित राहणार आहेत. जवळपास १७ पक्ष आज उपस्थित होते”, अशी माहिती शरद पवार यांनी दिली. शरद पवारांच्या घरी बैठकीला कोणकोणते नेते उपस्थित? काँग्रेसकडून मल्लिकार्जुन खर्गे, जयराम रमेश राष्ट्रवादीकडून शरद पवार द्रमुक कडून तिरुची शिवा टीआरएसकडून केशवराव आणि नमो नागेश्वर राव शिवसेनेकडून संजय राऊत, विनायक राऊत सीपीएमकडून सीताराम येचुरी सीपीआय ते डी राजा राजदकडून ए.डी सिंह समाजवादी पक्षाकडून राम गोपाल यादव व्हीसीके कडून थिरुमावल्लवम आणि सुवेंकटेसन डी एम डी के कडून वायको

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या