JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शिवसेनेचे खासदार विनायक राऊत म्हणाले, माननिय मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब! VIDEO

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत म्हणाले, माननिय मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब! VIDEO

बऱ्याच वेळा बोलण्याच्या ओघामध्ये कुठल्या पक्षाचा कोणता मंत्री आहे? त्याकडे कोणते पद आहे. याचेही भान बोलताना राहत नाही. विनायक राऊत यांच्या बाबतीत असाच प्रकार घडला आहे.

जाहिरात

बऱ्याच वेळा बोलण्याच्या ओघामध्ये कुठल्या पक्षाचा कोणता मंत्री आहे? त्याकडे कोणते पद आहे. याचेही भान बोलताना राहत नाही. विनायक राऊत यांच्या बाबतीत असाच प्रकार घडला आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सिंधुदुर्ग, 02 ऑक्टोबर : शिवसेनेचे नेते रामदास कदम (ramdas kadam audio clip viral) यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (Shiv Sena MP Vinayak Raut) बोलता बोलता चक्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांनाच विसरून गेले. विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री म्हणून थेट काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण (ashok chavan) यांचं नाव घेतलं आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे ते आघाडी सरकार सत्तेवर आले आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा स्वत:च्या खांद्यावर घेतली आहे.  बऱ्याच वेळा बोलण्याच्या ओघामध्ये कुठल्या पक्षाचा कोणता मंत्री आहे? त्याकडे कोणते पद आहे. याचेही भान बोलताना राहत नाही.  सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदार संघाचे खासदार आणि शिवसेना सचिव असलेले विनायक राऊत यांच्या बाबतीत असाच प्रकार घडला आहे.

खासदार विनायक राऊत हे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगाव खोऱ्यातील कोल्हापूर- सिंधुदुर्ग जोडणारा आंजिवडे घाटाची पाहणी करण्यासाठी आले होते. आंजिवडे येथे प्रसारमाधम्यांशी बोलत असताना महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेसचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचा चक्क राज्याचे मुख्यमंत्री असा उल्लेख केला आहे. त्यांच्या या विधानामुळे एकच खळबळ उडाली आहे. स्वतःच्या पक्षातील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असल्याचा विसर विनायक राऊत यांना पडल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावलेल्या पहायला मिळाल्या. त्यांच्या या विधानामुळे एकच हशा पिकली आहे. ज्येष्ठ साहित्यिक द.मा.मिरासदार यांचं निधन विशेष म्हणजे, विनायक राऊत आणि नारायण राणे यांच्यातला संघर्ष संपूर्ण कोकणात सर्वश्रुत आहे. पण आज विनायक राऊत स्वत:च मात्र नको ते बोलून बसले आहे. त्यामुळे नारायण राणे यांना आयतेच कोलित मिळाले असून ते काय टीका करतील, हे पाहण्याचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या