मुंबई, 14 सप्टेंबर: महाराष्ट्रात पोलिसांवर दबाव आणून चुकीचे कलम लावले जात आहे. गुंडागर्दी करणं शिवसेनेची जुनी सवय आहे आणि अशा परिस्थितीत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. त्यावरून शिवसेना प्रवक्ते अनिल परब यांनी रामदास आठवले यांची खिल्ली उडवली आहे. रामदास आठवले हे अर्धे शटर बंद झालेलं दुकान आहे, अशा शब्दांत अनिल परब यांनी आठवले यांचा समाचार घेतला. हेही वाचा… शिवसेना प्रवक्ते भडकले, मुंबई POK वाटत असेल तर कंगनानं बोरा बिस्तर गुंडाळावा बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिनं काल राज्यपाल यांची भेट घेतली. एवढंच नाही तर तिनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोपही केले. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना प्रवक्ते आणि परिवहनमंत्री अनिल परब यांनी कंगनाला तीव्र शब्दांत सुनावलं आहे. कंगनाला मुंबई पाकव्याप्त काश्मीर (POK)वाटत असेल तर तिनं योग्य वाटत असेल तिथं राहावं. कंगनानं आपला बोरा बिस्तर गुंडाळावा. मुंबईबद्दल वाईट बोलत असेल आम्ही ऐकून घेणार नाही. कंगनाचं आपलं बस्तान उचलावं हेच योग्य ठरेल, अशा शब्दांत अनिल परब यांनी इशारा दिला आहे. रामदास आठवले यांनी काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना रणौतची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला होता. मात्र, नंतर त्यांनी महाराष्ट्रात थेट राष्ट्रपती राजवटी लागू करण्याची मागणी केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. काय म्हणाले होते रामदास आठवले? अभिनेत्री कंगना रणौत आणि शिवसेनेतील वाद चांगलाच पेटला असताना रिपब्लिकन पक्ष तिला सुरक्षा देईल, असं वक्तव्य रामदास आठवले यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. एवढं नाही तर कंगना मुंबईत आल्यानंतर रामदास आठवलेंनी तिची भेट घेतली होती. हेही वाचा… महापौर किशोरी पेडणेकरांनी मुंबईकरांना जोडले हात, काय म्हणाल्या…पाहा VIDEO दरम्यान, मुंबई महापालिकेने कंगना रणौतचं पाली हिल येथील कार्यालय तोडल्यानंतर आता आणखी एक नोटीस कंगणाला देण्यात आली आहे. तिच्या खारघरमधील घराचं बांधकाम अवैध असून त्यासाठीची नोटीस तिला महापालिकेने दिली आहे. आता यावरुन कंगणाला अजून एक धक्का बसणार का यावर चर्चा सुरू झाली आहे.कंगना हिनं फ्लॅट घेतल्यानंतर पाच वर्षांनी म्हणजेच 13 मार्च 2018 रोजी बीएमसीकडे एक तक्रार आली होती. तिनं फ्लॅट्समध्ये बेकायदा बांधकाम केल्याचं तक्रारीत म्हटलं होतं.