JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Shiv Sena Divakar Ravate : ज्यांनी शिवसेना सोडली त्यांची आत्महत्या झाली आहे, असे वाटले पाहिजे दिवाकर रावतेंचा बंडखोरांवर निशाणा

Shiv Sena Divakar Ravate : ज्यांनी शिवसेना सोडली त्यांची आत्महत्या झाली आहे, असे वाटले पाहिजे दिवाकर रावतेंचा बंडखोरांवर निशाणा

माजी मंत्री दिवाकर रावते यांनी सांगली दौरा केला यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांचा चांगलाच समाचार घेतला. यावर बंडखोर आमदार काय म्हणतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 जुलै : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत 40 आमदारांना घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन केले. यानंतर शिवसेनेकडून आदित्य ठाकरे महाराष्ट्र दौरा करत शिवसंवाद यात्रा काढत आहेत तर शिवसेनेतील काही नेते राज्यातील जिल्हा दौरे करत शिवसैनिकांचा आत्मविश्वास वाढवत आहेत. या निमीत्ताने माजी मंत्री दिवाकर रावते यांनी सांगली दौरा केला यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांचा चांगलाच समाचार घेतला. जे बाहेर गेले त्यांची आत्महत्या झाली आहे, असे वाटायला पाहिजे असल्याचे दिवाकर रावते म्हणाल्याने बंडखोर आमदार काय म्हणतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. (Shiv Sena Divakar Ravate)

ते म्हणाले कि, शिवसेना कार्यकर्त्यांनी कोणत्याही पदाची अपेक्षा न करता पक्षाचे एकनिष्ठपणे काम करा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मला फोन येत आहेत की, आम्ही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहोत. पूर्वीपेक्षा जास्त ताकतीने पक्ष उभा राहील. आतापासून कामाला लागा. शिवसेनेकडूनच शिवसेना पाडायची हा डाव आहे. या लढाईत शिवसैनिक म्हणून काम करायचे आहे. जे बाहेर गेले त्यांची आत्महत्या झाली आहे, असे वाटायला पाहिजे. असे रावते म्हणाले.

हे ही वाचा :  भीषण वास्तव! शिंदे सरकारच्या 24 दिवसांच्या काळात 89 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

संबंधित बातम्या

यावेळी रावते म्हणाले कि, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी जी विधायक कामे केली आहेत, ती जनतेपर्यंत पोहोचवा. बंडखोर जे गेले ते सेनेचे कधी नव्हते. भाजप बंडखोरांना जवळ करून सेना संपविण्याचे काम करीत आहे. ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे, ती कधीही संपणार नाही. जे गेलेले आहेत त्यांना आपण आपल्या पक्षामार्फत आगामी येणाऱ्या निवडणुकीत संपवायचं आहे, अशा इशारा शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी दिला.

जाहिरात

ते म्हणाले, शिवसेना कार्यकर्त्यांनी कोणत्याही पदाची अपेक्षा न करता पक्षाचे एकनिष्ठपणे काम करा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मला फोन येत आहेत की, आम्ही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहोत. पूर्वीपेक्षा जास्त ताकतीने पक्ष उभा राहील. आतापासून कामाला लागा. शिवसेनेकडूनच शिवसेना पाडायची हा डाव आहे. या लढाईत शिवसैनिक म्हणून काम करायचे आहे. जे बाहेर गेले त्यांची आत्महत्या झाली आहे, असे वाटायला पाहिजे. यावेळी नितीन बानगुडे पाटील, जिल्हा प्रमुख संजय विभुते यांची भाषणे झाली.

जाहिरात

हे ही वाचा :  कांदा स्वस्त होणार? कांद्याच्या किमतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल

काल सांगली येथे कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी जिल्हा संघटक दिगंबर जाधव, बजरंग पाटील, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सुजाताई इंगळे आदी उपस्थित होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या