JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / हिंमत असेल तर आजच आत्ता सरकार पाडून दाखवा - उद्धव ठाकरेंचं भाजपला खुलं आव्हान

हिंमत असेल तर आजच आत्ता सरकार पाडून दाखवा - उद्धव ठाकरेंचं भाजपला खुलं आव्हान

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मध्यावधी निवडणुकीची तयारी करत आहोत, असं वक्तव्य केलं त्याला 24 तास व्हायच्या आत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला जाहीर व्यासपीठावरून थेट सरकार पाडून दाखवा असं आव्हान दिलं आहे.

जाहिरात

Aurangabad: Shiv Sena party chief Uddhav Thackeray addresses in support of BJP-Shiv Sena candidate Ramesh Bornare ahead of the Maharashtra Assembly polls, at Vaijapur in Aurangabad district of Maharashtra, Thursday, Oct. 10, 2019. (PTI Photo) (PTI10_10_2019_000131B)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जळगाव, 15 फेब्रुवारी : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मध्यावधी निवडणुकीची तयारी करत आहोत, असं वक्तव्य केलं त्याला 24 तास व्हायच्या आत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला जाहीर व्यासपीठावरून थेट सरकार पाडून दाखवा असं आव्हान दिलं आहे. मुक्ताईनगरमध्ये बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, “आमच्या तीन पक्षाचं सरकार व्यवस्थित सुरू आहे. पण विरोधकांच्या पोटात खुटखुटतंय. आम्ही सत्तेला हपापलेलो नाही. आजच काय आत्ता सरकार पाडून दाखवा. माझं आव्हान आहे.” महाविकासआघाडी सरकार आपसातल्या मतभेदांमुळेच पडेल, असं वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी काल केलं होतं. “आम्ही सरकार पाडणार नाही. तसा प्रयत्नही करणार नाही. आपसातल्या मतभेदांमुळे आपोआप सरकार कोसळेल”, असं सांगताना पाटील यांनी मध्यावधी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे, असं ते म्हणाले. “कुठल्याही राजकीय पक्षाने निवडणुकीला नेहमीच तयार असलं पाहिजे. एका रात्रीत तयारी होत नसते.”  एप्रिलनंतर ऑपरेशन लोटस होईल, असा उल्लेख केला गेला. या वक्तव्याचा समाचार उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मुक्ताईनगरच्या भाषणात केला. “ऑपरेशन लोटस कसलं करता.. आम्ही लोटलं तुम्हाला. पुन्हा लोटतो”, असं ठाकरे म्हणाले. हे वाचा - राज ठाकरे म्हणाले पक्षातच आहे गद्दार, 2 दिवसांत नावं समोर आणून करणार हकालपट्टी मुक्ताईनगरमध्ये महाविकासआघाडीला मिळालेल्या यशाचा उल्लेख करून खडसेंचं नाव मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, “आज मुक्ताईनगर खऱ्या अर्थाने मुक्त झालं. संकटावर मात करण्याची जिद्द मुक्ताईनगर मध्ये आहे " मनसेबरोबप जाणार नाही दरम्यान ऑपरेशन लोटसविषयी बोलताना भाजप नेते विनोद तावडे म्हणाले, राजकीय पक्षाला निवडणुकीची तयारी ठेवावीच लागते. मध्यावधी निवडणुकांसाठी आम्ही प्रयत्न करतोय असा त्याचा अर्थ होत नाही. राज ठाकरे यांनी बांग्लादेशींचा मुद्दा लावून धरल्याने ते भाजपबरोबर जाणार अशी चर्चा सुरू आहे. त्याविषयी बोलताना तावडे म्हणाले. भाजप मनसेबरोबर इतक्यात तरी जाणार नाही. तशी शक्यता नाही. महाराष्ट्रात भाजपला बसू शकतो आणखी एक धक्का, खासदार कमी होणार?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या