JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी फायनान्स कंपनीच्या ऑफिसची केली तोडफोड, 3 जणांविरोधात गुन्हा दाखल

शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी फायनान्स कंपनीच्या ऑफिसची केली तोडफोड, 3 जणांविरोधात गुन्हा दाखल

फायनस कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी येऊन त्यांच्या पत्नीस दादागिरी व दमदाटी केल्याने शिंदे गटाचे कार्यकर्ते चांगलेच संतापले.

जाहिरात

फायनस कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी येऊन त्यांच्या पत्नीस दादागिरी व दमदाटी केल्याने शिंदे गटाचे कार्यकर्ते चांगलेच संतापले.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नितीन नांदूरकर, प्रतिनिधी जळगाव, 11 जानेवारी : कर्जाचा हप्ता थकल्याने फायनान्स कंपनीने लोक घरी का पाठवले म्हणून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बजाज फायनान्स कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी 3 जणांविरोधात पोलिसांमध्ये गुन्ह दाखल केला आहे. अमळनेर येथील शिंदे गटाचे तालुकाप्रमुख प्रथमेश पवार यांनी बजाज फायनान्स कंपनीकडून 4 लाख 27 हजारांचं कर्ज घेतलं आहे. पण डिसेंबर महिन्यात कर्जाचा हफ्ता थकला. त्यामुळे  फायनस कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घरी येऊन कर्जाचा हफ्ता भरण्यास सांगितले. यावेळी  आपल्य पत्नीला दादागिरी व दमदाटी केल्याचा आरोप प्रथमेश पवार यांनी केला. त्यामुळे शिंदे गटाचे कार्यकर्ते चांगलेच संतापले. कार्यकर्त्यांनी फायनान्स कंपनीचे कार्यालय गाठले आणि टेबल-खुर्च्या आणि संगणकांची तोडफोड केली. (Shivsena : निवडणूक आयोगात शिंदेंनी टाकला ‘बॉम्ब’, ठाकरेंना बसणार सगळ्यात मोठा धक्का!) या प्रकरणी बजाज फायनान्स कंपनीकडून पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. कर्जाचा हफ्ता थकल्यामुळे पवार यांनी पैसे भरण्यास सांगितले होते. पण, त्यांनी पैसे भरले नाही. त्यानंतर आपल्या समर्थकांसह ते कार्यालयात आले आणि तोडफोड केली. यावेळी पवार आणि त्यांच्या साथीदारांनी कर्जाची कागदपत्र आणि 86 हजार 390 रुपयांची रोख घेऊन गेले, असं तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणी प्रथमेश पवार, सनी अभंगे आणि सचिन अभंगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. (कवाडे शिंदेंसोबत आल्याने आठवले नाराज, भाजपने आरपीआयला स्पष्टच सांगितलं!) दरम्यान, शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या अपघात प्रकरणात एक नवीन ट्विस्ट समोर आले आहे. अपघात प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या डंपर चालकाने खोटी जबानी पोलिसांना दिली असल्याचा दावा आमदार योगेश कदम यांचे वडील माजी मंत्री रामदास कदम यांनी दिली आहे. आमदार योगेश कदम यांच्या वाहनाला ठोकर देणाऱ्या डंपर चालकाला उत्तर प्रदेश येथून अटक केल्यानंतर ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात घडला असा जबाब डंपर चालकाने पोलिसांना दिला होता. पण संबंधित डंपरचे ब्रेक फेल झालेले नव्हते हे आता उघड झाले असल्यामुळे या चालकाने खोटा जबाब दिल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या