JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'कोरोना'चा मुकाबला करण्‍यासाठी साईबाबा संस्थान सरसावले, सरकारला दिले 51 कोटी

'कोरोना'चा मुकाबला करण्‍यासाठी साईबाबा संस्थान सरसावले, सरकारला दिले 51 कोटी

देश व राज्‍यावर आलेल्‍या कोरोना व्‍हायरसच्‍या संकटाचा मुकाबला करण्‍यासाठी शिर्डीच्या साईबाबा संस्थानने मोठा निर्णय घेतला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

शिर्डी, 27 मार्च: देश व राज्‍यावर आलेल्‍या कोरोना व्‍हायरसच्‍या संकटाचा मुकाबला करण्‍यासाठी शिर्डीच्या साईबाबा संस्थानने मोठा निर्णय घेतला आहे. 51 कोटी रुपयांचा निधी मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीस देण्‍याचा निर्णय साईबाबा संस्‍थानच्‍या समितीने घेतला असल्‍याची माहिती मुख्‍य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली आहे. अरुण डोंगरे यांनी सांगितले की, जगभरात व देशभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्‍हायरसच्‍या मुकाबल्‍यास तोंड देण्‍यासाठी केंद्र व राज्‍य सरकार सज्‍ज आहे. याच पार्श्‍वभूमीवर श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍त व्‍यवस्‍थेच्‍या वतीने या संकटाचा मुकाबला करण्‍यासाठी 51 कोटी रुपयांचा निधी मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीस देण्‍याचा निर्णय संस्‍थानच्‍या समितीने घेतला आहे. हेही वाचा.. RBI ने कर्जवसुली स्थगितीबाबत दिलेल्या ‘सल्ल्या’वर पवारांची पहिली प्रतिक्रिया संस्‍थानचे साईप्रसादालयाच्‍या वतीने श्री साईबाबा हॉस्पिटल व श्री साईनाथ रुग्‍णालयातील रुग्‍ण व नातेवाईक, शिर्डी परिसरातील अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, मुखबधीर विद्यालय, बंदोबस्‍तावरील पोलिस कर्मचाऱ्यांना, शिर्डी बस स्‍थानकावरील निराधार व गरजुंना आणि संस्‍थानच्‍या व शासकीय कार्यालयातील सरंक्षण, स्‍वच्‍छता व इतर कार्यरत कर्मचा-यांना निशुल्‍क भोजन पुरवण्‍यात येत आहे. हेही वाचा.. कोरोनाच्या भीतीने कर्मचारी गायब, पुणे-मुंबईचा दूध पुरवठा ठप्प होण्याची शक्यता खेडोपाडी बंदोबस्‍तावर असलेल्‍या पोलिस कर्मचाऱ्यांना अल्‍पोहारासाठी आजपासून 3 हजार बुंदीची व 3 हजार चिवडयाची पाकिटे जिल्‍हा पोलिस मुख्‍यालयाला देण्‍यात येत आहेत. संस्‍थानच्‍या वतीने यापूर्वी ही राष्‍ट्रीय व नै‍सर्गिक आपत्‍तीत वेळोवेळी मदत केलेली आहे. यामध्‍ये केरळमधील पुरामुळे आपदग्रस्‍त झालेल्‍या पुरग्रस्‍तांसाठी 5 कोटी, राज्‍यातील पुरग्रस्‍तांच्‍या मदतीसाठी 12 कोटी तसेच पुलवामा येथील शहीद झालेल्‍या जवानांच्‍या कुटुंबीयांच्‍या मदतीकरीता 2.51 कोटी रुपये निधी देण्‍यात आलेला असल्‍याचेही अरुण डोंगरे यांनी सांगितले. याप्रसंगी संस्‍थानचे उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्‍यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे हे उपस्‍थित होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या