JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला कोरोना, भाजप आमदार पडळकरांची जहरी टीका

शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला कोरोना, भाजप आमदार पडळकरांची जहरी टीका

‘बहुजन समाजातील लोकांवर अन्याय करण्याची त्यांची भूमिका राहिलेली आहे. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा नाही’

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पंढरपूर, 24 जून : भाजपकडून नुकतेच विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आलेले गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर विखारी टीका केली आहे. ‘शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला कोरोना आहे, अशी टीका आमदार पडळकर यांनी केली आहे. पंढरपूरमध्ये आज गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येऊ नये, असा विरोधाच गोपीचंद पडळकर यांनी केला. तसंच शरद पवारांवर टीका करताना पडळकरांचा तोलही ढासळला. ‘शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला कोरोना आहे. राज्याचे नेतृत्त्व त्यांनी केले पण बहुजन समाजातील लोकांवर अन्याय करण्याची त्यांची भूमिका राहिलेली आहे. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा नाही.  फक्त छोट्या छोट्या समाजाना भडकवायचे आणि त्यांना आपल्या बाजूला करायचे आणि अन्याय करायचा एवढेच काम पवार करत आहेत’ अशी जहरी टीका पडळकरांनी केली. हिंदू धर्मासाठी 9 वर्षे तपश्चर्या! मुस्लीम तरुणासह कुटुंबातील 35 जण झाले हिंदू ‘धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न त्यांना सोडवायचा नाही. फक्त आरक्षणाचे राजकारण शरद पवार करत आहेत’, असा आरोपही पडळकरांनी केला. ‘उद्धव ठाकरेंनी महापूजेला येऊ नये’ कोरोनचा संसर्ग टाळण्यासाठी पंढरपुरात उद्यापासून प्रवेश बंदी आहे. चातुर्मासासाठी पंढरपुरात आलेल्या महाराजांना पंढरपूरमध्ये राहण्याची परवानगी प्रशासनाने नाकारली आहे. अशातच आषाढी एकादशी महापूजेसाठी जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार असतील तर ते योग्य नाही. मोठी बातमी, सातव्या वेतन आयोगाबद्दल राज्य सरकारने काढला नवीन आदेश कारण, कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या मुंबईमधून ते येणार आहेत. मग अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरात येणे योग्य  नाही. त्यामुळे यंदा महापूजेचा मान हा एखाद्या सामान्य वारकरी शेतकरी कुटुंबाला द्यावा अशी मागणीही पडळकर यांनी केली आहे. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग संपल्यानंतर राज्यभर आंदोलन करण्याचा इशाराही  पडळकर यांनी दिला आहे. संपादन - सचिन साळवे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या