JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Birthday आहे रेड्याचा, जल्लोष साऱ्या गावाचा अन् खर्च झाला लाखाचा, VIDEO पाहून व्हाल अवाक

Birthday आहे रेड्याचा, जल्लोष साऱ्या गावाचा अन् खर्च झाला लाखाचा, VIDEO पाहून व्हाल अवाक

शहापूर येथे चक्क एका रेड्याचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला आहे. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.

जाहिरात

VIDEO: Birthday आहे रेड्याचा, जल्लोष साऱ्या गावाचा अन् खर्च झाला लाखाचा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

शहापूर, 6 जानेवारी : आपण घोडा, कुत्रा, मांजर प्रेमी पाहिलेत आणि त्यांचा वाढदिवस साजरा करताना देखील पहिले असतील. मात्र शहापूरमध्ये चक्क रेडा प्रेमी पाहावयास मिळाला. शहापूर तालुक्यातील सापगावामध्ये (Sapgaon Shahapur) रेडाप्रेमी सुरेश महादू अंदाडे या शेतकऱ्याने आपल्या रामू नावाच्या रेड्याचा मोठ्या जल्लोषात वाढदिवस साजरा केला आहे. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. (Birthday celebration video viral) रेड्याला सजवून, मोठा केक बनवून त्यावर रेड्याचा फोटो तयार करून फाटक्याची अतिशबाजी करण्यात आली. यासोबतच बँजो ढोल-ताशाच्या गजरात नाचगाणे करीत मोठ्या जल्लोषात वाढदिवस साजरा केला. या रेड्याच्या वाढदिवसाचा व्हिडीओ सर्वत्र चांगलाच व्हायरल होत आहे. हा रेडा झुंज खेळण्यात पटाईत आहे. त्यामुळे आता बैलगाडा परवानगी पाठोपाठ पालघर, ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आवडत्या रेड्यांच्या झुंजीचा विषय समोर येतो की काय अशी चर्चा जोर धरू लागली आहे.

कारण ठाणे, पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा रेड्यांची झुंज हा पारंपरिक आवड असताना त्यावर बंदी असल्याने शेतकरी नाराज असल्याने सणात चोरून लपून झुंज लावण्यात येत असते त्यामुळे आता झुंजीचा विषय ऐरणीवर येण्याची शक्यता निर्माण झालीय. कोरोनाचं थैमान असताना सेलिब्रेशन राज्यात कोरोनाचा प्रादुर्बाव मोठ्या वेगाने होत आहे. दिवसेंदिवस बाधितांच्या आकडेवारीत मोठी वाढ होताना दिसत आहे. असे असताना शहापूर तालुक्यात मोठ्या जल्लोषात वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी सेलिब्रेशनसाठी नागरिकांनीही मोठी गर्दी केल्याचं दिसून येत आहे. मालकाच्या वाढदिवशी कुत्र्याचं सेलिब्रेशन कुत्र्यांचाही आपल्या मालकावर खूप जीव जडलेला असतो. आपल्या मालकासाठी शक्य ते सर्वकाही करण्याचा प्रयत्न ते करताना दिसतात. कुत्र्यांचे असे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात कुत्रा आपल्या मालकाचा बर्थडे साजरा करताना दिसला. एका कुत्र्याने आपल्या मालकाचा बर्थडे सेलिब्रेट केला आहे. कदाचित असा व्हिडीओ तुम्ही कधी पाहिला नसावा. व्हिडीओत दिसत आहे की, सुरुवातीला तो सर्वांकडे पाहताना दिसतो. आपली मालकीण केक कापताच सर्वजण टाळ्या वाजवू लागतात. तसा तोसुद्धा आपले पुढील दोन्ही पाय उचलतो आणि टाळ्या वाजवताना दिसतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या