JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / विकासकामांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार; एकनाथ खडसेंचा शिंदे गटाच्या आमदारावर गंभीर आरोप

विकासकामांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार; एकनाथ खडसेंचा शिंदे गटाच्या आमदारावर गंभीर आरोप

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी मुक्ताईनगरचे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर धक्कादायक आरोप केला आहे. आमदार विकासकामे मंजूर करुन आणतात अन् काम न करता ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या मदतीने बिले काढतात, असं ते म्हणाले.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जळगाव 17 सप्टेंबर : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरचे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर धक्कादायक आरोप केले आहेत. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात काम न करता बिले काढण्याची स्पर्धा लागली आहे. ठेकेदार आणि अधिकारी यांच्या संगनमताने 9 कोटी रुपयांचं बिल काम न करता काढलं. नियमबाह्य कामांना स्थगिती देत हा भ्रष्टाचार लपविण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांनी केला आहे. आमदार विकासकामं मंजूर करुन आणतात अन् काम न करता ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या मदतीने बिले काढतात, असं ते म्हणाले. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी मोठी अपडेट, ED ने संजय राऊतांविरोधात टाकलं पुढचं पाऊल! याबाबत उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. यात उच्च न्यायालयाने तिन्ही अधिकाऱ्यांना नोटीस काढल्या आहेत. एक रुपयांचं काम न करता, कोट्यवधी रुपयांची बोगस बिले काढली जातात तसंच ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना राजकीय संरक्षण दिलं जातं, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. जिल्ह्यात सर्वत्र असे प्रकार सुरु असल्याचा आरोपी खडसेंनी केला आहे. हा प्रकार चौकशीतून समोर आला आहे. आता उच्च न्यायालनेही त्याची नोंद घेतली आहे, असं सांगत एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरचे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर धक्कादायक आरोप केला आहे. बच्चू कडूंना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायचंय? पुन्हा व्यक्त केल्या भावना, पाहा VIDEO मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री 20 सप्टेंबर रोजी जळगाव जिल्ह्याचा दौऱ्यावर आहेत. यावर एकनाथ खडसे यांना विचारले असता ते म्हणाले की, या दोघांचा मी स्वागत करतो. शेकडो कामं मंजूर आहेत मात्र त्यांना स्थगिती दिली आहे तर काही कामे मंजूरीच्या प्रतिक्षेत आहेत. विकासकामांची स्थगिती उठवावी आणि इतर कामांना मंजूरी द्यावी, तसंच विकासकामांना गती द्यावी अशी विनंती करतो, असं ते म्हणाले. तसंच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री विकासकामांना निधी देतील आणि स्थगिती उठवतील अशी आशा व्यक्त करतो, असं एकनाथ खडसे म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या