मुंबई, 28 नोव्हेंबर : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाआघाडीचा आज शपथविधी सोहळा होतोय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत तर तिन्ही पक्षांच्या दोन-दोन नेत्यांची शपथविधी सोहळ्यासाठी नावं आहेत. महाविकास आघाडीत शिवसेना आणि काँग्रेस या दोन पक्ष्यांची विचारसरणी वेगळी असल्याने त्यांचं कसं जमणार याबद्दल चर्चा सुरू आहेत. या तिन्ही पक्षांनी किमान समान कार्यक्रम बनवला असला तरी शिवसेनेचं हिंदुत्व काँग्रेसला मान्य नाही आणि महाविकास आघाडीत यावरूनच एकमत होत नव्हतं. थेट तिहारमधून… आता काँग्रेसचे नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या महाविकास आघाडीला एक सल्ला दिला आहे. चिदंबरम गेले 3 महिने INX मीडिया भ्रष्टाचार प्रकरणी तिहार तुरुंगात आहेत. महाविकास आघाडीमधल्या पक्षांनी आपली स्वत:ची धोरणं बाजूला ठेवून लोकांच्या कल्याणासाठी काम करावं. शेतकऱ्यांचं कल्याण, गुंतवणूक, रोजगार आणि सामाजिक न्याय या गोष्टींना त्यांनी प्राधान्य द्यावं, असं चिदंबरम म्हणतात. पण हे सगळं लिहिताना चिदंबरम मात्र भ्रष्टाचाराच्या प्रकरणांत तुरुंगात आहेत हे लक्षात घ्यायला हवं.
कुटुंबीयांना दिला हा निरोप अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतरही चिदंबरम यांनी ट्वीट केलं होतं. त्यात ते म्हणतात, मी माझ्या कुटुंबीयांना हे ट्वीट करायला सांगितलं आहे. 23 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 2019 या काळात जे घटनेचं उल्लंघन झालं ते सगळ्यांच्याच लक्षात राहील, असं त्यांनी म्हटलं आहे. चिदंबरम यांच्या ट्विटर अकाउंटवरून केलेल्या ट्वीटमध्ये, मी माझ्या कुटंबीयांना हे ट्वीट करायला सांगितलं आहे, असं वाक्य आहे. ते सध्या तुरुंगात असल्याने त्यांनी कुटुंबीयांवर ही जबाबदारी सोपवली.
काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम हे 74 वर्षांचे आहेत. त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक आघाड्या तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पी. चिदंबरम यांच्यावर CBI ने 15 मे 2017 ला FIR दाखल केला होता.