JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / महाराष्ट्रभरातील संवादयात्रेनंतरही पक्षाची स्थिती चिघळली; आदित्य ठाकरेंना मोठा धक्का 

महाराष्ट्रभरातील संवादयात्रेनंतरही पक्षाची स्थिती चिघळली; आदित्य ठाकरेंना मोठा धक्का 

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना हा मोठा धक्का आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 जुलै : एकनाथ शिंदे यांनी 50 आमदारांना वेगळं करीत शिंदे गटाची स्थापना केली. यानंतर गेल्या अनेक दिवसात शिवसेनेतील आमदार, खासदारांसह अनेक पदाधिकारी शिंदे गटात गेले आहे. पक्ष वाचवण्यासा ठी आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रभरात संवाद यात्राही काढली. मात्र तरीही पक्षातील गळती सुरूच आहे. शिवसेनेपाठोपाठ आता युवासेनेतही राज्यभरात उभी फूट पडल्याचं दिसून येत आहे. राज्यभरातील युवासेनेचे 40 वरिष्ठ पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना हा मोठा धक्का आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील युवासेनेचे प्रमुख पदाधिकारी शिंदे गटात गेले आहेत. एकनाथ शिंदेंना शिवसेना पक्ष आणि पक्षाचं चिन्ह हवं असेल तर निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार पक्षातील उभी फूट दाखवणं आवश्यक आहे. ही फूट पक्षातील खासदार, आमदारांसह शेवटच्या टोकापर्यंत दाखवणं गरजेचं आहे. एकनाथ शिंदेनी आमदारांसह बाहेर पडल्यापासून गेल्या अनेक दिवसात मोठ्या संख्येने शिवसैनिक शिंदे गटात जात आहेत. त्यात आता युवासेनेलाही हा मोठा धक्का आहे. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काल मुंबईच्या काळाचौकी येथील शिवसेना शाखेचं मोठ्या जल्लोषात उद्घाटन झालं. यावेळी उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांवर सडकून टीका केली. तुम्ही कसले मर्द, तुम्ही वडील चोरायला निघालेत, तुम्ही दरोडेखोर आहात, अशा खोचक शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी टीका केली. तसेच निवडणुकीच्या प्रचाराला शिवसेना प्रमुख म्हणजे माझे वडील बाळासाहेब ठाकरे यांचं नाव न घेता आपल्या आई-वडिलांच्या नावाने मतं मागा, असंदेखील आव्हान उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना दिलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या