JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Satara : ट्रेकर्सना दिवाळी गिफ्ट! दुर्गप्रेमींचा आवडता किल्ला सर करण्याचा मार्ग मोकळा, Video

Satara : ट्रेकर्सना दिवाळी गिफ्ट! दुर्गप्रेमींचा आवडता किल्ला सर करण्याचा मार्ग मोकळा, Video

स्वयंभू तीर्थक्षेत्र नागेश्वर,चक्रदेव, पर्वत ही ट्रेकिंगची पर्यटनस्थळे देखील खुली करण्यात आलेली आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सातारा, 20 ऑक्टोबर : जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेला वासोटा किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. पावसाळ्यामुळे मागील चार महिन्यांपासून येथील पर्यटन बंद करण्यात आले होते. आता हा किल्ला पर्यटकांना फिरण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. येथे असलेली स्वयंभू तीर्थक्षेत्र नागेश्वर,चक्रदेव, पर्वत ही ट्रेकिंगची पर्यटनस्थळे देखील खुली करण्यात आलेली आहेत. त्यामुळे दिवाळी सुट्यांमध्ये पर्यटक येथे पर्यटकांची गर्दी वाढणार आहे.   सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील वासोटा किल्ला अवघड असून ट्रेकर्सला भुरळ घालणारा आहे. येथील पर्यटन स्थळ पावसामुळे मागील काही महिन्यांपासून बंद करण्यात आले होते. ते आता पुन्हा सुरू करण्यात आले आहे. वासोटा किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील अनुभूती देणारा दुर्गयात्रींचा आवडता किल्ला आहे. या किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून 1175 मीटर इतकी आहे. नैसर्गिक दुर्गमता लाभलेला हा किल्ला जावळीच्या जंगलामधील एक अनोखे दुर्गरत्‍न मानले जाते. Video : ‘त्या’ शेतकऱ्यांची दिवाळी अखेर गोड, माजी सनदी अधिकाऱ्यामुळे मिळाला विमा! किल्ल्यावर शंकराचे एक प्राचीन मंदिर, हनुमान मंदिर, जुन्या वाड्याच्या पायाचे भक्कम अवशेष व बुरूज आढळतात. परिसरातील आणि जिल्ह्याबाहेरील अनेक पर्यटक याठिकाणी भेट देतात. हा किल्ला पर्यटकांसाठी आता खुला करण्यात आल्याची माहिती माहिती बामणोलीचे वनक्षेत्रपाल हसबनीस यांनी दिली.   पर्यटन व्यवसायाला मिळेल गती पर्यटन सुरू झाल्याने आता या ठिकाणी कास- बामणोलीसह वासोटा येथे पर्यटन व्यवसायाला पुन्हा एकदा गती मिळेल, अशी आशा येथील स्थानिकांनी व्यक्त केली आहे. किल्ल्यासह स्वयंभू तीर्थस्थान नागेश्वर, चकदेव आणि पर्वत सुद्धा पर्यटकांना खुले झाले आहे.   इको फ्रेंडली दिवाळी साजरी करण्यासाठी आंध्रातील कलाकार करतायत मदत, पाहा Video प्रवेश शुल्कात वाढ  पर्यटन स्थळांवर जाण्यासाठी पर्यटकांना सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कार्यालयाकडून प्रवेश शुल्कात वाढ करण्यात आली आहे. प्रवेश वाढीव शुल्काप्रमाणे 12 वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीला आता 30 रुपयांऐवजी 100 रुपये मोजावे लागणार आहेत. आणि 12 वर्षाच्या आतील मुलांना 50 रुपये दर आकारला जाणार आहे. गाईड शुल्क 250 आणि बोट वाहन 150 रुपये राहणार आहे. डीएसएलआर लेन्स कॅमेरा शुल्क 50 वरून 100 करण्यात आले आहे. सध्या मोबाईल पॉईंट शूट कॅमेऱ्यास पूर्वी शुल्क आकारले जात नव्हते मात्र आता त्यासाठी सुद्धा 50 रुपये शुल्क आकारले जाणार आहेत.  

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या