JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Satara Crime : धावत्या एसटी बसमध्ये तरुणीसोबत अश्लील चाळे, पोलीस कर्मचाऱ्याचा कृत्याने साताऱ्यात खळबळ

Satara Crime : धावत्या एसटी बसमध्ये तरुणीसोबत अश्लील चाळे, पोलीस कर्मचाऱ्याचा कृत्याने साताऱ्यात खळबळ

सातारा ते कराड असा प्रवास करणाऱ्या महाविद्यालयीन युवतीची कोल्हापूर पोलीस दलातील एकाने बसमध्ये छेड काढली.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सातारा, 18 ऑक्टोबर : साताऱ्यात काल एक खळबळजनक घटना घडली. सातारा ते कराड असा प्रवास करणाऱ्या महाविद्यालयीन युवतीची कोल्हापूर पोलीस दलातील एकाने बसमध्ये छेड काढली. कोल्हापूर पोलिस दलातील महेश मगदुमवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा ते कराड असा एसटीने प्रवास करणाऱ्या महाविद्यालयीन युवतीच्या शेजारी बसलेल्या पोलिसाने तिच्या सोबत आश्लिल चाळे केले. याबाबत त्या मुलीने आपल्या पालकांना घडलेल्या घटनेची महिती दिल्याने पालकांसोबत तिचे मित्र मैत्रीणी कराड बस स्थानकात आल्याने काही काळ तणावाचे वातावरण बनले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, सातारा ते कराड असा प्रवास करणाऱ्या महाविद्यालयीन युवतीची कोल्हापूर पोलीस दलातील एकाने बसमध्ये छेड काढली. कोल्हापूर पोलिस दलातील महेश मगदुमवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा ते कराड असा एसटीने प्रवास करणाऱ्या महाविद्यालयीन युवतीच्या शेजारी बसलेल्या पोलिसाने तिच्या सोबत आश्लिल चाळे केले. याबाबत त्या मुलीने आपल्या पालकांना घडलेल्या घटनेची महिती दिल्याने पालकांसोबत तिचे मित्र मैत्रीणी कराड बस स्थानकात आल्याने काही काळ तणावाचे वातावरण बनले होते.

हे ही वाचा :  इथे ओशाळलं नातं, चारित्र्याच्या संशयावरुन पतीचं टोकाचं पाऊल, नालासोपारा हादरलं

संबंधित बातम्या

दरम्यान संबधित युवतीने याबाबतची माहिती फोनवरुन तिच्या आई-वडीलांसह मित्र मैत्रिनींना दिली. कराड एसटी स्टॅन्डवर पोहोचेपर्यंत तिचे मित्र पोलिसांसोबतच पोहचले. छेड काढणाऱ्याला ताब्यात घेतले. संबधित हा कोल्हापूर जिल्हात पोलिस खात्यात असून तो पोलिस खात्यातील खेळाडू आहे. सातारा शहरात सुरू असलेल्या पोलिसांच्या स्पर्धेसाठी तो आला होता. या पोलिसाचे नाव महेश मगदूम असे आहे.

जाहिरात

हे ही वाचा :  Kolhapur Crime : तांदूळ, कुंकू आणि नोटा, वाड्यात सुरू होता भयंकर प्रकार, शाहूंच्या कोल्हापुरातली धक्कादायक घटना

संबधित महाविद्यालयीन युवतीने कराड पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारी नुसार संशयीत आरोपी महेश याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बोरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने हा गुन्हा बोरगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून आणि ताब्यात घेतलेल्या संशयीत आरोपी महेश मगदूम यालाही बोरगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या