JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Konkan Cold Wave : पश्चिम महाराष्ट्रासह कोकण किनारपट्टीवर थंडीचा जोर वाढणार, अलर्ट जारी

Maharashtra Konkan Cold Wave : पश्चिम महाराष्ट्रासह कोकण किनारपट्टीवर थंडीचा जोर वाढणार, अलर्ट जारी

राज्यातील विदर्भ, मध्यमहाराष्ट्र, उत्तरेकडील काही राज्यात तर आता कोकणातही थंडीचा कहर जाणवण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 जानेवारी : देशाच्या उत्तर भागात थंडीच्या लाटेमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान या थंडीचा परिणाम आता महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांवर होताना दिसत आहे. राज्यातील विदर्भ, मध्यमहाराष्ट्र, उत्तरेकडील काही राज्यात तर आता कोकणातही थंडीचा कहर जाणवण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

उत्तरेतून वाहणाऱ्या वाऱ्याचा परिणाम राज्यातील बहुतेक जिल्ह्यांवर होणार असल्याची शक्यता हवामान विभागने वर्तवली आहे. मुंबईसह संपूर्ण कोकण किनारी भागात, उत्तर महाराष्ट्रात काही भागांत 18 जानेवारीपर्यंत थंडीचा मुक्काम असेल त्यामुळे कोकणातील गारठा आणखी दोन दिवस असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हे ही वाचा :  13 वा हप्ता कधी येणार, तुम्हाला लाभ मिळणार की नाही लगेच चेक करा

संबंधित बातम्या

दरम्यान पुढचे दोन दिवस थंडी राहणार आहे यानंतर मात्र तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याचा अंदाज आहे. मुंबईसह संपूर्ण कोकण किनारी भागात, उत्तर महाराष्ट्रात काही भागांत 18 जानेवारीपर्यंत थंडी राहण्याची शक्यता आहे. यामुळे कोकणातील गारठा आणखी दोन दिवस राहणार आहे. त्यानंतर मात्र किमान तापमानात वाढ होईल, असा हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर पुढील 48 तास थंडीचा कोकणात अलर्ट जारी केली आहे.

उत्तरेकडून थंड वारे येत असल्याने महाराष्ट्रातील किनारी भागात तापमान कमी होत आहे. त्यामुळे बाष्पाचा पुरवठा आणि ढगाळ स्थिती निर्माण होऊन तापमानात चढ-उतार होत आहे. उत्तरेकडे कडाक्याची थंडी आणि पाठोपाठ पावसाळी वातावरण, तसेच दाट धुक्याचे वातावरणही तयार होत आहे. त्याचा परिणाम किनारी भागावर होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यातील कमाल आणि किमान तापमानात घट होत होती. मागच्या दोन दिवसांत रत्नागिरीतील काही भगात किमान तापमान 20 अंशाखाली आले तर सोमवारी सकाळी ते 2 अंश सेल्सिअसने वाढले होते.  

जाहिरात

हे ही वाचा :  इंडियन बँकेची शेतकऱ्यांसाठी खास ऑफर, ऑनलाइन कर्जासह मिळणार ‘या’ सुविधा

मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील सर्वच भागात किमान तापमान खाली घसरले आहे. कोकण, पुणे, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, लातूर, उस्मानाबाद आणि विदर्भामध्ये बहुतांश जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका वाढणार आहे. परिणामस्वरूप हुडहुडी जाणवणार आहे. (दि. 18) जानेवारीपर्यंत थंडीचा मुक्काम वाढून गारठा वाढण्याची शक्यता आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या