मुंबई 18 नोव्हेंबर : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलं आहे. यानंतर शिंदे गट आणि भाजपने ठाकरे गटावरही निशाणा साधायला सुरुवात केली. सावकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत ठाकरे गट जात असल्याची टीका केली जात असतानाच आता संजय राऊत यांनी या प्रकरणावर अतिशय महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरेंच्या आदेशानंतर कार्यकर्ते कामाला, राहुल गांधींच्या सभेआधी मनसे ‘लोकेशन’वर! राहुल गांधींनी मध्येच वीर सावरकरांचा मुद्दा आणण्याची गरज नव्हती. त्यामुळे महाविकास आघाडीतही फूट पडू शकते, असा थेट इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे. त्यांच्या या विधानामुळे चर्चांना उधाण आलं आहे. वीर सावरकर हे नेहमीच आमचे श्रद्धास्थान राहिले आहेत आणि नेहमी राहतील. काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी यांनीही स्पष्टपणे आणि परखडपणे सांगितलं, की वीर सावरकरांची कोणत्याही प्रकारे बदनामी, चुकीचं वक्तव्य शिवसेनेला मान्य नाही. शिवसेना ते सहन करणार नाही. हे सांगितल्यावर आमचा विषय संपतो, असंही संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट शब्दात सांगितलं. त्यांनी वीर सावरकरांबाबतचं अशाप्रकारचं वक्तव्य खपवून घेणार नसल्याचं सांगत महाविकास आघाडी फूट पडू शकते असा थेट इशाराच दिल्याने त्यांचं हे विधान चांगलंच चर्चेत आलं आहे. ‘…तर उद्धव ठाकरेंनी चुल्लू भर पाण्यात डुबून…’, आता रवी राणांचं वादग्रस्त विधान उद्धव ठाकरे काय म्हणाले - उद्धव ठाकरे यांनी आपण राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याशी सहमत नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. हे सांगतानाच त्यांनी भाजपवरही निशाणा साधला. स्वातंत्र्य आंदोलनात भाजप आणि त्यांची संघ कुठे होता? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला.