JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Weather Update Cold Wave : राज्यात आणखी 8 दिवस थंडीचा कहर, मुंबई पुण्यासह या जिल्हांना इशारा

Weather Update Cold Wave : राज्यात आणखी 8 दिवस थंडीचा कहर, मुंबई पुण्यासह या जिल्हांना इशारा

राज्यातील बहुतांश जिल्ह्याचा पारा 15 अंशाच्या खाली आल्याने बोचऱ्या थंडीचा अनुभव लोकांना मिळत आहे. तसेच थंडीच्या प्रमाणात आणखी वाढ होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 जानेवारी : राज्यात मागच्या काही दिवसांपासून उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग वाढल्याने थंडी वाढली आहे. दरम्यान राज्यातील जवळपास 20 च्या वर जिल्ह्यात थंडीची लाट आली आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्याचा पारा 15 अंशाच्या खाली आल्याने बोचऱ्या थंडीचा अनुभव लोकांना मिळत आहे. तसेच थंडीच्या प्रमाणात आणखी वाढ होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. पुढचे 8 दिवस थंडी कायम राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर मुंबई आणि पुण्यातही थंडी वाढली आहे. मागच्या 24 तासात मुंबईकरांना थंडीचा अनुभव घेता आला.

मागच्या चार दिवसांपासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि मुंबई तसेच कोकणात थंडी वाढली आहे. विदर्भ व उत्तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांत तसेच परभणी, गोंदिया, अकोला, बुलढाणा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, नागपूर, वाशिम, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांतही थंडीचा कडका कायम आहे.

संबंधित बातम्या

हे ही वाचा :  जळगाव झाले ‘थंड’गाव, सर्वात निच्चांकी तापमान असूनही गारठा आणखी वाढणार

जाहिरात

पुणे, सातारा, सांगली, महाबळेश्वर, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांतही किमान तापमानात घट झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील बहुतांश शहरांत सकाळी दाट धुके पडणार आहे. तसेच पुढील आठ ते दहा दिवस थंडीची लाट राहणार आहे.

उत्तरेकडून येणार्‍या थंड वार्‍यांमुळे राज्यात थंडीची लाट कायम असून, पुढील आठ ते दहा दिवस कडाक्याची थंडी राहणार आहे. किमान तापमानात थोडासा चढ-उतार राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, सलग तिसर्‍या दिवशी राज्यात जळगाव शहराचे तापमान नीचांकी नोंदले असून, तेथे तापमानाचा पारा 7.5 अंशांवर पोहोचला आहे. पुण्यातील किमान तापमान 8.1 अंश सेल्सिअस होते.

जाहिरात

हे ही वाचा :  राज्यात पुढचे 48 तास महत्वाचे; थंडीची लाट आणखी तीव्र होणार, मुंबई, पुण्यात पारा घसरला

राज्यात कडाक्याची थंडी पडली असून पुढील दोन ते तीन दिवसानंतर पारा आणखी घसरण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. गोंदिया, नाशिक, औरंगाबाद, नागपूर याठिकाणी 5 ते 6 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. तर वाढती थंडी काही पिकांसाठी फयाद्याची ठरते आहे. वाढती थंडी गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरते आहे. हीच स्थिती कायम राहिल्यास यंदा गव्हाचे चांगले उत्पादन होण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या