JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Sangli : सामान्य रुग्णांनी काय करायचं? शासकीय रुग्णालयात महिनाभरापासून औषधांचा तुटवडा, Video

Sangli : सामान्य रुग्णांनी काय करायचं? शासकीय रुग्णालयात महिनाभरापासून औषधांचा तुटवडा, Video

औषधांचा तुटवडा असल्यानं बाहेरून औषधांची खरेदी करावी लागत असल्यानं आर्थिक झळ बसत आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सांगली, 14 डिसेंबर : सांगली तील शासकीय रुग्णालयात महिनाभरापासून औषधांचा साठा संपला आहे. त्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. वातावरण वातावरणामुळे शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या वाढली आहे. ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्ण, दारिद्र्यरेषेखालील नागरिकांची उपचार घेण्यासाठी रुग्णालयात गर्दी असते. मात्र, औषधांचा तुटवडा असल्यानं बाहेरून औषधांची खरेदी करावी लागत असल्यानं आर्थिक झळ बसत आहे.  गोरगरिबांचा आधार असलेल्या सांगलीच्या पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात एक महिन्यापासून औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णांच्या जखमेवर ड्रेसिंग करायचे साहित्य नाही. मधुमेह, रक्तदाबावरील गोळ्यांचीही कमतरता आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना सर्रासपणे बाहेरून औषधे खरेदीसाठी चिठ्ठी दिली जात आहे. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांचे सध्या हाल सुरू आहेत. सांगली, कोल्हापूर, सातारा तसेच कर्नाटक राज्यातील रुग्ण येथे उपचारांसाठी दाखल होतात. येथे अवघड शस्त्रक्रिया, तसेच चांगले उपचार दिले जातात, अशी शासकीय रुग्णालयाची ओळख आहे. रुग्णालय अधिक उत्तम बनवण्यासाठी कोट्यवधी रुपयांची निधी शासनाने मंजूर केला आहे. परंतु औषधासाठीचा निधी शासनाने वाढवून दिला नसल्याचं चित्र आहे. परिणामी रुग्णासाठी लागणारे औषध बाहेरून खरेदी करावे लागत आहेत. Pune : 11 वर्षांनंतर महिलेची झाली ऑक्सिजन सिलिंडरपासून सुटका, पाहा Video या कारणानं टंचाई गेल्या कित्येक वर्षापासून औषध खरेदीसाठी वर्षाला केवळ दोन कोटी रुपयांचा निधी दिला जात आहे. दररोज दीड हजारांहून अधिक रुग्ण बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी दाखल होतात. साडेचारशेहून अधिक रुग्णांना वार्डात दाखल करून उपचार केले जातात. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासनाला सातत्याने औषध टंचाईचा सामना करावा लागत आहे. पालकांनो, बाळाकडं लक्ष द्या! खेळताना कुणी पिन गिळली तर कुणी… सिव्हिल प्रशासनाचा पाठपुरावा  शासनाने रुग्णालयात औषध दुकान सुरू केले. मात्र, गोरगरीब रुग्णांना औषधे मिळावीत, यासाठी निधी वाढवून देण्यासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाही. औषध पुरवठा सुरळीत करण्यासाठी सिव्हिल प्रशासन पाठपुरावा करत आहे, अशी माहिती सिव्हिल प्रशासनातर्फे देण्यात आली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या