सांगली, 08 डिसेंबर : सांगली च्या तासगाव तालुक्यामधील पेड या गावातील शेतकऱ्यानं स्वतःच्या द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवली. सततच्या होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकऱ्याने द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवली आहे. गेली दोन वर्ष कोरोना सारख्या महामारीने द्राक्षाला दर मिळाला नाही. मशागतीचा वाढता खर्च, बदलते वातावरण, अवकाळी पाऊस यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यातून उभारी न मिळालेल्या शेतकऱ्यानं अखेर तीस गुंठे द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवली आहे. कर्ज आणि नुकसान शेतकरी विलास शेंडगे यांचे बँक ऑफ इंडियाचे साडेचार लाख रुपये कर्ज आहे. त्यांनी खाजगी सावकाराकडून दोन ते अडीच लाख रुपये कर्ज काढले आहे. एकूण त्यांना सात ते आठ लाख रुपये या दोन वर्षात कर्ज झाले आहे. या कर्जामुळे शेतीतील वाढता मशागतीचा खर्च परवड नाही. त्यातच मागील काही दिवसांत पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाकडून मिळणारी तुटपुंजी मदत दिलासा देणारी आहे. मात्र ती मदत वेळेवर मिळावी अशी अपेक्षा शेतकरी करू लागला आहे. पांढरं सोनं वेचायला परराज्यातून मजूर बोलवण्याची शेतकऱ्यांवर वेळ दिव्यांग असूनही शेतात काम बाग लावून गेली चार-पाच वर्षे झाली. बाग लावून म्हणावा तेवढा नफा मिळाला नाही. खर्च जास्त आणि उत्पन्न कमी निघत असल्यानं चिंता वाढली. बाग लावल्यापासून पतिपत्नी या बागेत राबत आहेत. पती हाताने दिव्यांग असून देखील काम करतो. सकाळ-संध्याकाळ बागेच्या औषधासाठी मदत करतो. रब्बी पिकावर बुरशीचा हल्ला, शेतकऱ्यांची चिंता वाढली मागे झालेल्या पावसामुळे बागेवर रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्या रोगांमध्ये बागेचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे यातून उभारी न मिळाल्याने अखेर तीस गुंठे द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ आली. शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावे, आम्हाला मदत करावी, अशी विनंती शेतकरी विलास शेंडगे यांच्या पत्नी मनीषा यांनी केली आहे.