Representative Image
सांगली, 19 जून: मागील एका महिन्यात 87 कोरोना रुग्णांच्या मृत्यूस (Corona patients deaths) कारणीभूत ठरलेल्या मिरज येथील अॅपेक्स रुग्णालयाच्या (Apex Hospital) प्रमुख डॉक्टरला अटक (Chief doctor arrest) करण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत (Corona virus 2nd wave) संबंधित रुग्णालयाला कोविड सेंटरची परवानगी देण्यात आली होती. मात्र गेल्या एका महिन्यात या रुग्णालयात तब्बल 87 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शिवाय अनेक रुग्णांकडून जास्तीची बिलं देखील आकारली असल्याच्याही अनेक तक्रारी आल्या आहेत. या प्रकरणी अॅपेक्स रुग्णालयाच्या प्रमुख डॉक्टरला अटक करण्यात आली असून पुढील कारवाई केली जात आहे. महेश जाधव असं अटक केलेल्या डॉक्टरचं नाव आहे. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत जाधव यांच्या अॅपेक्स रुग्णालयाला कोविड सेंटर सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र याठिकाणी रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुविंधांचा मोठ्या प्रमाणात अभाव असल्याचं निष्पन्न झालं आहे. शिवाय याठिकाणी दाखल होणाऱ्या रुग्णांवर शिकाऊ डॉक्टरांकडून उपचार केल्याचंही उघडकीस आलं आहे. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मागील एका महिन्यांत 87 रुग्णांचा हकनाक जीव गेला आहे. हेही वाचा- Web Series पाहून रचला कट; कोरोनामध्ये उपचार करणाऱ्या डॉक्टरलाच अडकवलं जाळ्यात याप्रकरणी वाढत्या तक्रारीनंतर सांगली महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी हॉस्पिटलवर कारवाई केली होती. त्यानंतर आता सांगली महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल दाखल केली आहे. पोलिसांनी रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर महेश जाधव यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी प्रमुख डॉक्टरला अटकही करण्यात आली आहे. हेही वाचा- लॉकडाऊनमध्ये काम नाही; अभिनेत्रींनी निवडला चोरीचा मार्ग, पोलिसांकडून अटक खरंतर, या प्रकरणाचा तपास सुरू असताना रुग्णालयांत 205 रूग्ण उपचार घेत होते. यातील 87 रुग्णांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक खुलासा देखील समोर आला आहे. त्याचबरोबर रुग्णालय प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या कागदपत्रातही अनेक त्रुटी आढळल्या आहेत. कोरोना नियमावलीनुसार अॅपेक्स रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात आले नाहीत. याठिकाणी कोणत्याही प्रकारच्या अद्यावत सुविधा उपलब्ध नव्हत्या. शिवाय शिकाऊ डॉक्टरांकडून रुग्णांवर उपचार करण्यात येत होते. त्यामुळे अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. या सर्व बाबी पोलीस तपासात उघड झाल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.