सामना अग्रलेखातून रोज सरकारच्या कामावर बोट ठेवत जोरदार आगपाखड केली जात असते. परंतु आज सामना वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे.
मुंबई, 03 नोव्हेंबर : महाविकास आघाडीची सत्ता गेल्यापासून महाविकास आघाडीतील नेते सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. दरम्यान शिवसेनेत बंडखोरी झाल्याने ठाकरे गट आणि शिंदे गटात एकमेकांवर हल्लाबोल केला जातो. शिंदे गट आणि भाजपवर ठाकरे गटाकडून टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाही. दरम्यान सामना अग्रलेखातून रोज सरकारच्या कामावर बोट ठेवत जोरदार आगपाखड केली जात असते. परंतु आज सामना वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. सामना वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहिरात झळकल्याची माहिती समोर आल्याने जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान ही जाहीरात शासकीय असल्याने माहीती व जनसंपर्क विभागाकडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क विभागाकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ही जाहिरात आजच्या सामनामध्ये छापून आली आहे. या जाहिरातीत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांचेही नाव नमूद करण्यात आले आहे. याचबरोबर राहुल नार्वेकर, दीपक केसरकर, मंगलप्रभात लोढा, उदय सामंत, शंभुराज देसाई यांचीही नावे आहेत.
हे ही वाचा : शिंदे सरकारचा मविआला दणका, ‘त्या’ फायली उघडणार, CBI करणार चौकशी!
ठाकरे गटावर मनसेकडून जोरदार टीका
स्वातंत्र्याची 75 वर्ष एका वर्षात 75 हजार रोजगार देण्याचा महाराष्ट्राचा महासंकल्प पहिल्या टप्यातील नियुक्तीपत्रे प्रदान करण्याचा राज्यस्तरीय कार्यक्रमाची ही जाहिरात आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहणार आहेत. आज (दि.03) अकरा वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे याबाबतच्या एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यावर मनसेकडून ठाकरे गटावर जोरदार टीका करण्यात आली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी “खोके” सामना मध्ये पोहचले का? असा सवाल करण्यात आला आहे.
मात्र, या कार्यक्रमाची जाहिरात आणि त्यामध्ये ठळकपणे पंतप्रधान मोदी आणि एकनाथ शिंदे यांचा असलेला फोटो राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. एकीकडे एवढे राजकीय वितुष्ट असताना ‘सामना’मध्ये मोदी आणि एकनाथ शिंदेचा फोटो पहिल्या पानावर कसा झळकतो, असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जात आहे.
हे ही वाचा : प्रताप सरनाईकांना मोठा धक्का, ईडीने बरोबर केली 11.35 कोटींची संपत्ती जप्त
खासदार राहुल शेवाळेंनी केला होता आरोप
मागच्या काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी त्यांना शुभेच्छा देणाऱ्या जाहिराती नाकारल्याचा दावा शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी केला होता. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बंडखोरी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आला होता. वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या जाहिराती पाठवल्या पण त्या नाकारण्यात आल्याचे खासदार शेवाळे यांनी सांगितले होते.