JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Pune Crime : सेवानिवृत्त शिक्षक महिलेला बँकेतच लुटण्याचा गंभीर प्रकार, घटना सीसीटीव्हीत कैद

Pune Crime : सेवानिवृत्त शिक्षक महिलेला बँकेतच लुटण्याचा गंभीर प्रकार, घटना सीसीटीव्हीत कैद

पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये पैशाचा भरणा करण्यासाठी आलेल्या सेवानिवृत्त शिक्षक महिलेला हातचलाखी करत लुटल्याची धक्कादायक घटना घडलीय.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 30 ऑगस्ट : पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये पैशाचा भरणा करण्यासाठी आलेल्या सेवानिवृत्त शिक्षक महिलेला हातचलाखी करत लुटल्याची धक्कादायक घटना घडलीय. (Pune Crime) त्यामुळे बँक ऑफ महाराष्ट्रची सुरक्षा रामभरोसे झालीय का असाच प्रश्न उपस्थित केला जातोय. भरदिवसा महिलेची फसवणूक करत लुटण्याचा प्रकार बँकेच्या cctv कँमेरात कैद झालाय.

राजगुरुनगर शहरातील मध्यवर्ती भागात असणाऱ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकेत सेवानिवृत्त पती पत्नी शिक्षक बँकेतील खात्यात पैशाचा भरणा करण्यासाठी गेले होते. बँकेच्या स्लिपवर स्वाक्षरी घेत असताना बँकेतच पैसे मोजण्याचा बहाणा करत एका अज्ञात इसमाने महिलेच्या हातातील पैसे एकत्र करुन देतो असे सांगीतले. या दरम्यान हातचलाखी करत 27 हजार रुपये लंपास करुन बँकेतुन पसार झाला.

हे ही वाचा :  बहिणीवर इंजिनिअर भावाकडून लैंगिक अत्याचार; मारहाण करत जीवे मारण्याचीही धमकी

संबंधित बातम्या

त्यामुळे भर दिवसा सेवानिवृत्त शिक्षक महिलेला बँकेतच लुटण्याचा गंभीर प्रकार घडला असून राजगुरुनगर पोलीसांत अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे बँक ऑफ महाराष्ट्रमधील सुरक्षा रामभरोसे आहे का? असाही प्रश्न या निमित्ताने उभा राहतोय.

घटना सीसीटीव्हीत कैद

कॅश काऊंटरजवळचा हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. कॅप घातलेली एक व्यक्ती रांगेत उभी असल्याचे दिसत आहे. संबंधित महिलेशी संवाद साधत त्याने महिलेच्या हातातील कॅश घेत मोजून देण्याचा बहाणा केला आणि हातचलाखी करत नोटा आपल्याजवळ घेतल्या.

जाहिरात

हे ही वाचा :  भाजपच्या महिला नेत्याने गाठला क्रूरतेचा कळस; मोलकरणीला घरात डांबून दात तोडले, गरम तव्याने दिले पूर्ण शरीरावर चटके

विशेष म्हणजे काही वेळ रांगेत उभे राहत आपला नंबर येण्याआधीच ही व्यक्ती तेथून पसार होते, हे सीसीटीव्हीत दिसत आहे. आता या आरोपींचा राजगुरूनगर पोलीस शोध घेत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या