JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Pune: क्रांतीकारकांच्या वाड्याचा जीर्णोद्धार, 139 वर्षांपूर्वीचा इतिहास पुन्हा जिंवत, VIDEO

Pune: क्रांतीकारकांच्या वाड्याचा जीर्णोद्धार, 139 वर्षांपूर्वीचा इतिहास पुन्हा जिंवत, VIDEO

Pune : 139 वर्षांपूर्वी क्रांतीकारकांचं वास्तव्य असलेल्या या वाड्याचा आता जीर्णोद्धार करण्यात आला असून हा वाडा सामान्यांसाठी खुला करण्यात आला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 18 ऑगस्ट :  पुणे शहराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. या वारसाची साक्ष देणारे पुण्यामध्ये अनेक वास्तू देखील आहेत. अशीच एक वास्तू म्हणजे भाऊसाहेब रंगारी वाडा! स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये अनेक क्रांतिकारकांना भूमिगत व्हावं लागत असे. त्यावेळी रंगारी वाडा (Shrimant Bhausaheb Rangari Wada) या क्रांतीकारकांची हक्काची जागा होता. तब्बल 139 वर्ष जुन्या असलेल्या या वाड्याचा आता जीर्णोद्धार करण्यात आला असून हा वाडा सामान्यांसाठी खुला करण्यात आला आहे. वाड्यात काय आहे? भाऊसाहेब रंगारी ट्रस्टचे विश्वस्त पुनित बालन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी श्रींमत भाऊसाहेब रंगारी, लोकमान्य टिळक आदी क्रांतिकारकांनी केलेली चळवळ या भवनातून सुरू केली होती. क्रांतिकारकांचे माहेरघर असलेल्या या भवनात गुप्त दालन, भुयारी रस्ते, ब्रिटीशकालीन ऐतिहासिक शस्त्रास्त्रे, ‘ईस्ट इंडीया कंपनी’ची पेटी व वाड्याला असलेली सेंट्रल लॉकिंग सिस्टीम इत्यादी आकर्षणांबरोबरच पर्यटकांसाठी ऑडिओ व व्हिडिओ क्लिपही असणार असून हे भवन सर्वांसाठी विनाशुल्क सकाळी 9 ते रात्री 10 पर्यंत खुले असणार आहे. देशातील स्वातंत्र्य चळवळीत क्रांतीकारकांनी केलेले योगदान नव्या पिढीला कळावे हा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवन आणि संग्रहालयाचा प्रयत्न आहे. पुण्यातील इस्कॉन मंदिरात कसा साजरा होतो जन्माष्टमी महोत्सव, पाहा VIDEO गुगल मॅप वरून साभार या वाड्याचे नूतनीकरण करणे हे अवघड काम होते. दीडशे वर्षांपूर्वीचे बांधकाम असल्यानं वाड्यात मातीच्या भिंती होत्या. तसंच त्या काळातील पुस्तकी विटांचे बांधकाम होते. या सर्व गोष्टींची नव्यानं जमवाजमव करून आम्हाला हे काम करावे लागले. 15 महिने अथक मेहनत करून आम्ही हे काम पूर्ण केले आहे. भाऊसाहेब रंगारी वाड्याचा पत्ता - 662, 657, भाऊ रंगारी रोड, बुधवार पेठ, पुणे, 411002 वाडा पाहण्याची वेळ - सकाळी 9 ते रात्री 10 हा वाडा पाहण्यासाठी कोणतेही शूल्क नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या