पुणे, 27 ऑक्टोबर : आईने मुलाच्या विरोधात इंदापूर पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरून संतापलेल्या मुलाने जन्मदात्या आईला शिविगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली आहे. जवळचं पडलेला लाकडी ओंडका उचलून आईच्या डोक्यात घालून तिला जखमी केल्याची धक्कादायक घटना इंदापूर तालुक्यातील पळसदेव गावात घडली आहे. दरम्यान मारहाण करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. याबाबत वैजयंता भिकुदास जाधव (वय 68 वर्षे) रा.पळसदेव तालुका इंदापूर यांच्या फिर्यादीवरुन दिलीप भिकुदास जाधव राहणार पळसदेव तालुका इंदापूर याविरूद्ध इंदापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
24 ऑक्टोबर रोजी वैजयंता भिकुदास जाधव या घरी होत्या. या दरम्यान मोठा मुलगा दिलीप भानुदास जाधव यांने त्याच्या विरोधात इंदापूर पोलीसांत तक्रार दिल्याच्या कारणावरून शिवीगाळ दमदाटी केली. त्याने जवळ पडलेला लाकडी ओंडका उचलून आई वैजयंता जाधव यांच्या डोक्यात फेकून मारून दुखापत केले. त्यानंतर चक्कर येऊन त्या खाली जमिनीवर कोसळल्या. वैजयंता जाधव यांच्यावर खाजगी रूग्णालयात प्रथमोपचार करुन पुढील उपचार उपजिल्हा रुग्णालय येथे करण्यात आले आहेत.
हे ही वाचा : फटाके फोडण्याचं नाव झालं, पुण्यात 17 आगीच्या घटना, यवतमाळमध्ये 3 दुकानं जळून खाक
याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी (दि. 24) वैजयंता भिकुदास जाधव या घरी होत्या. या दरम्यान मोठा मुलगा दिलीप भानुदास जाधव यांने त्याच्या विरोधात इंदापूर पोलीसांत तक्रार दिल्याच्या कारणावरून शिवीगाळ दमदाटी केली. त्याने जवळ पडलेला लाकडी ओंडका उचलून आई वैजयंता जाधव यांच्या डोक्यात मारून दुखापत केली, आणि त्या चक्कर येऊन खाली जमिनीवर कोसळल्या. त्यानंतर वैजयंता जाधव यांच्यावर खासगी रूग्णालयात प्रथमोपचार करुन पुढील उपचार उपजिल्हा रुग्णालय येथे करण्यात आले आहेत. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार सुरेंद्र वाघ करीत आहेत.
पुण्यातील दुसऱ्या घटनेने खळबळ
मागच्या काही दिवसांपूर्वी परतीच्या पावसाने पुणे जिल्ह्यात थैमान घातले होते. यामुळे नदी, ओढे, नाल्यांना पाणी भरपूर असल्याने पाण्याचा प्रवाह जोरात असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान शिरूर तालुक्यात पडलेल्या पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. अशातच कुकडी नदीवर आईसोबत कपडे धुण्यासाठी गेलेला मुलगा बुडल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने मुलगा वाहून गेल्याने अद्यापही त्याचा शोध लागला नाही.
हे ही वाचा : धक्कादायक! पुतण्यानं काकाच्या तोंडात फटाक्यांनी भरलेला पाईप कोंबून पेटवला, संपत्तीच्या वादातून कृत्य
शिरूर तालुक्यात म्हसे बुद्रुक येथे कुकडी नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेला बारा वर्षीय मुलगा बुडाल्याने खळबळ उडाली आहे. अक्षय गायकवाड असं या मुलाचे नाव आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने या मुलाचा शोध सुरू असून NDRF च्या जवानांना पाचारण करण्यात आले आहे.