JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Pune news: सावकाराच्या हव्यासापोटी ज्येष्ठ महिलेवर भीक मागण्याची वेळ, धक्कादायक माहिती उघड

Pune news: सावकाराच्या हव्यासापोटी ज्येष्ठ महिलेवर भीक मागण्याची वेळ, धक्कादायक माहिती उघड

Pune news: पुण्यातील एका 70 वर्षीय ज्येष्ठ महिलेवर सावकाराच्या हव्यासापोटी भीक मागण्याची वेळ आली असल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.

जाहिरात

Anusaya Patole

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 9 फेब्रुवारी: पुण्यातील एका 70 वर्षीय ज्येष्ठ महिलेवर सावकाराच्या हव्यासापोटी भीक मागण्याची वेळ आली असल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. पुण्यातील (Pune) गुरुवार पेठेत राहणाऱ्या 70 वर्षीय अनुसया पाटोळे (65-year-old Anusaya Patole) या अजीच्याच पुतण्याने बेकायदेशीर सावकारकीच्या माध्यमातून 40 हजार कर्ज घेणाऱ्या स्वतःच्याच अजीकडून 8 लाखापेक्षा जास्त पैसे वसूल केले असून त्या आजीला आज भीक मागायची वेळ आली आहे. पुणे महानगरपालिकेत काम करणाऱ्या एका अवैध सावकाराकडून या महिलेने नातिच्या उपचारासाठी 40 हजार रुपये कर्ज घेतले होते. त्या बदल्यात तिने या सावकाराला दीड लाख रुपये परत दिले. मात्र, त्याची हाव तितक्यावरच थांबली नाही.

दिलीप वाघमारे हा पुणे महानगरपालिकेच्या झाडू खात्यात नोकरीला आहे. नोकरी करत तो बेकायदेशीरपणे सावकारी देखील करत असतो. पाच वर्षांपासून त्याने या आजी कडून एकूण आठ लाख रुपये वसूल केले आहेत. वर्षाच्या अनुसया पाटोळे यानी पाच वर्षापुर्वी नातीचे दवाखान्याचे उपचाराकरीता 20 टक्के व्याज दराने 40 हजार रुपये आरोपी दिलीप विजय वाघमारे यांच्याकडून घेतले होते. त्या बदल्यात बँकेत लोन काढून आरोपीस मुद्दल 40 हजार रुपये व्याजापोटी 1 लाख रुपये दिले होते. त्यानंतर आरोपी वाघमारे याने त्या वयोवृद्ध महिलेचा अशिक्षीतपणाचा गैरफायदा घेवून आणखी व्याज आहे असे सांगून त्या महिलेचे दोन एटीएम कार्ड पासबुक घेतले. तसेच त्या एटीएम पर जमा होणारी पेन्शन ची रक्कम एकुण 16 हजार 344 रुपये महिना काढून घेवून तिला महिन्याला मोजकीच ते 2 हजार रुपये देत होता. असे त्याने पाच वर्षांपासून ते आतापर्यंत एकूण 8 लाख रुपये बेकायदेशीर व्याजासहीत वसूल केले आहेत. त्यामुळे या आजीना सारस बागेत भिक मागण्याची वेळ आली आहे. या सगळ्या प्रकारची तक्रार सामाजिक कार्यकर्त्यांनी केल्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करून आरोपी दीपक वाघमारे ला अटक करण्यात आली आहे. ‘पुण्यासारख्या शहरांमध्ये अजूनही बेकायदेशीर खाजगी सावकारी जात संपायचे नाव घेत नाही. यांमध्ये कुटुंबांमध्ये सुद्धा या खाजगी सावकारी ने शिरकाव केलाय. त्यामुळे पोलिसांनी या खाजगी सावकाराची पाळेमुळे उखडून काढायची गरज आहे. ‘अशी प्रतिक्रिया पोलीस उपनिरीक्षक यशपाल सूर्यवंशी यांनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या