JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / उत्तर भारतात तीव्र थंडीची लाट; महाराष्ट्रात कडाक्याच्या थंडीने होणार नवीन वर्षाचं स्वागत

उत्तर भारतात तीव्र थंडीची लाट; महाराष्ट्रात कडाक्याच्या थंडीने होणार नवीन वर्षाचं स्वागत

Weather Forecast Today: राजस्थान ते विदर्भादरम्यान निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा (Low pressure area) आता क्षीण झाला आहे. त्यामुळे राज्यातील किमान तापमानात किंचित घट (Temperature in maharashtra) झाली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 31 डिसेंबर: गेल्या दोन-तीन दिवसात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपीट (Thunderstorm with hailstorm) झाली आहे. अचानक झालेल्या गारपिटीमुळे रब्बी हंगामातील पिकं भुईसपाट झाली असून शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं आहे. दरम्यान राज्यातून थंडी गायब झाली होती. पण आता पुन्हा एकदा उत्तर भारतात थंडीची लाट (Cold wave) आली आहे. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात देखील येत्या काही दिवसांत गारठा वाढण्याची शक्यता आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा घटणार (Temperature in maharashtra) आहे. त्यामुळे नववर्षाचं स्वागत कडाक्याच्या थंडीने होण्याची शक्यता आहे. खरंतर, सध्या उत्तर भारतात थंडीची लाट सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी तापमानाचा पारा घसरला आहे. येत्या 2 दिवसांत वायव्य भारतात देखील तीव्र थंडीची लाट (Severe cold wave) येण्याची शक्यता आहे. याचा एकंदरित परिणाम म्हणून महाराष्ट्रात देखील गारठा वाढणार आहे. महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत 2 ते 4 अंश सेल्सिअस किमान तापमानात घट होऊ शकते. तर काही ठिकाणी तापमानाचा पारा 10 अंश सेल्सिअसच्या खाली जाण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

याशिवाय तामिळनाडू किनारपट्टी, पुडुचेरी, कराईकल परिसरात येत्या दोन दिवसांत अतिवृष्टीची शक्यता आहे. त्यानंतर हळुहळू पावसाचा जोर कमी होण्याची अंदाज हवामान खात्याकडून वर्तवला आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात पश्चिम हिमालयीन प्रदेशात मुसळधार पावसाची तर वायव्य भारताच्या मैदानी प्रदेशात जोरदार पावसासह हिमवृष्टीची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हेही वाचा- Breaking News: पिंपरीनंतर देशात Omicron चा दुसरा बळी राजस्थान ते विदर्भादरम्यान निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आता क्षीण झाला आहे. त्यामुळे राज्यातील किमान तापमानात किंचित घट झाली आहे. आज पुण्यातील माळीण याठिकाणी सर्वात कमी 13.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ इंदापूर (14.0), हवेली (14.1), राजगुरुनगर (14.1), आंबेगाव (14.1) आणि निमगीरी येथे 14.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पुण्यात इतर ठिकाणी किमान तापमान 15 ते 19 अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या