पुणे , 27 नोव्हेंबर : मनसे प्रमुख राज ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आहेत. आज त्यांची सभा होणार आहे. एकीकडे राज ठाकरे यांचा कोकण दौरा सुरू असताना दुसरीकडे मात्र पुन्हा एकदा पुण्यातील मनसेची अंतर्गत गटबाजी समोर आली आहे. मनसे नेते वसंत मोरे नाराज असल्याचं दिसतंय. दोन दिवसांपूर्वी मनसेचा शहर पदाधिकारी मेळावा पार पडला. या मेळाव्याला वसंत मोरे यांची देखील उपस्थिती होती. मात्र शहर पदाधिकारी मेळाव्याला उपस्थित असूनही मेळाव्यात त्यांना बोलण्याची संंधी न दिल्यानं ते नाराज झाले आहेत. वसंत मोरे नाराज त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. कोअर कमिटीत असूनही भाषणाची संधी मिळत नसेल तर ही कोअर कमिटी आमची फक्त ठासायला आहे का ? असा संतप्त सवाल वसंत मोरे यांनी केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, या आधीही असे प्रसंग अनेकदा घडले आहेत. राज ठाकरे यांच्यापर्यंत अनेकवेळा हा विषय गेला आहे. मात्र त्यांना अनेक कामं असतात. हा विषय कोअर कमिटीचा आहे. त्यामुळे त्यांनीच विचारा करावा अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली आहे. हेही वाचा : Gujarat Elections : गुजरातमध्ये आपची सत्ता येणार; केजरीवालांनी थेट लिहूनच दिलं! यापूर्वीही समोर आली होती गटबाजी दरम्यान पुणे मनसेमधील अंतर्गत गटबाजी समोर येण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वी देखील अंतर्गत गटबाजी समोर आली होती. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांच्याविरोधात भूमिका घेतल्यानंतर वसंत मोरे यांनी प्रतिक्रिया देताना नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळीही मनसेमधील गटबाजी पहायला मिळाली. आता पुन्हा एकदा वसंत मोरे नाराज झाले आहेत. हेही वाचा : Radhakrishna Vikhe Patil : वाचाळपणा बंद करा अन्यथा… राधाकृष्ण विखे पाटलांचा ठाकरेंवर प्रहार राज ठाकरेंचा कोकण दौरा दरम्यान दुसरीकडे राज ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याला सुरुवात झाली आहे. आज राज ठाकरे यांची सभा होणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा माणण्यात येत आहे. आजच्या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.