ऊपुणे, 20 मे : मागच्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे फळांचा राजा आंबा (alphonso mango) भारताबाहेर विक्रीस गेला नव्हता. (Hapoos export) आंब्याला परदेशातून खूप मागणी असते परंतु कोरोनामुळे (corona pandemic) यात खंड पडला होता. सध्या अमेरिकेत आंब्याची निर्यात (mango export in America white house) होत असल्याची माहिती मिळत आहे. दोन वर्षांच्या कालावधीनंतर अमेरिकेत भारतीय आंब्याची निर्यात पुन्हा सुरू झाल्यामुळे, या आठवड्यात वॉशिंग्टन येथे होणाऱ्या आंबा महोत्सव कार्यक्रमात काही प्रसिद्ध जातींचे बॉक्स अमेरिकी प्रशासनाला भेट दिले जाण्याची शक्यता आहे. (mango export)
मागच्या दोन वर्षांपासून देशात विवीध ठिकाणी पिकला जाणारा आंबा कोरोनामुळे परदेशात विकला गेला नव्हता. यामुळे यंदा आंब्यांची निर्यात परदेशात होणार असल्याने आंब्याला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान उत्तम दर्जाचा आंबा निर्यात होणार असल्याने आंबा उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. दोन वर्षांपासून असलेली निर्यांत बंदी उठवल्याचा फायदा होणार आहे.
हे ही वाचा : Weather Updates: ‘या’ राज्यात पूरस्थिती गंभीर, Yellow अलर्ट जारी; 7 लाखांहून अधिक लोक प्रभावित
दरम्यान इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार, हे आंबे पुण्यातील रेनबो इंटरनॅशनल या निर्यातदाराकडून निर्यात होणार आहेत. अमेरिकेतील व्हाईट हाऊसमध्ये महाराष्ट्रातील केसर, हापूस, गोवा मानकूर तसेच आंध्र प्रदेशातील हिमायत आणि बैगनपल्ली या पाच वाणांची खरेदी करण्यात आली आहे. असे रेनबो इंटरनॅशनलचे संचालक ए. सी. भासले यांनी इंडियन एक्सप्रेसला माहिती दिली.
अमेरिकेत आंब्याची निर्यात पुन्हा सुरू
भासले म्हणाले, हा आंबा पॅक करून सोमवारी हवाई मालवाहतुकीने अमेरिकेला पाठवण्यात आला. सुमारे दोन वर्षांच्या अंतरानंतर, केंद्राने यासाठी युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ अॅग्रीकल्चर (USDA) ची मान्यता मिळविल्यानंतर या वर्षी अमेरिकेत आंब्याची निर्यात पुन्हा सुरू झाल्याचे ते म्हणाले.
हे ही वाचा : चंद्रपूर : पेट्रोल टँकर आणि ट्रक अपघातातील मृतकांचा आकडा वाढला, 9 जणांचा होरपळून मृत्यू
कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय प्रवासावर लादलेल्या निर्बंधांमुळे विकिरण सुविधांच्या (inspection of irradiation facilities) तपासणीसाठी USDA निरीक्षकांना भारतात भेट देता आली नव्हती. म्हणून 2020 मध्ये भारतीय आंब्याच्या निर्यातीवर अमेरिकेने निर्बंध घातले होते. दरम्यान हे निर्बंध हटवले आहेत यामुळे निर्यातदारांना चांगल्या व्यवसायाची आशा असल्याने, बहुतेकांनी व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, यावर्षी अमेरिकन बाजारपेठेत केसरऐवजी हापूसला जास्त मागणी आहे.