JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पुणे : नशेत इमारतीच्या खिडकीतून उतरण्याचा प्रयत्न, चौथ्या मजल्याहून कोसळून मृत्यू, विचलित करणारं दृश्य

पुणे : नशेत इमारतीच्या खिडकीतून उतरण्याचा प्रयत्न, चौथ्या मजल्याहून कोसळून मृत्यू, विचलित करणारं दृश्य

दारू पिण्याच्या सवयीमुळे एका व्यक्तीने आपल्या पाचव्या मजल्यावरील घराच्या खिडकीतून उतरण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान त्याचा तोल गेला आणि तो खाली कोसळला. (Drunk Man Fell From Building)

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे 01 सप्टेंबर : दारूची नशा अनेकदा जीवघेणी ठरू शकते. नशेत असणाऱ्या व्यक्तीला अनेकदा आपल्यासमोर असलेल्या संकटांचा अंदाजही येत नाही. तर, अनेकदा ही व्यक्ती स्वतःलाच एखाद्या मोठ्या संकटात घेऊन जाते. दारूची नशा कशी जीवघेणी ठरू शकते हे दाखवणारी एक घटना नुकतीच पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडिओही समोर आला आहे. Pune Crime : सेवानिवृत्त शिक्षक महिलेला बँकेतच लुटण्याचा गंभीर प्रकार, घटना सीसीटीव्हीत कैद दारू पिण्याच्या सवयीमुळे एका व्यक्तीने आपल्या पाचव्या मजल्यावरील घराच्या खिडकीतून उतरण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान त्याचा तोल गेला आणि तो खाली कोसळला. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना पिंपरी शहरातील निगडी परिसरातल्या सेक्टर 22 येथील प्रेरणा सोसायटीच्या अकरा नंबर बिल्डिंगमध्ये घडली आहे.

संबंधित बातम्या

प्रेरणा सोसायटीमध्ये घडलेल्या या घटनेत अनिल कांबळे नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. हा व्यक्ती 50 वर्षाचा होता. त्याला दोन मुली आणि एक मुलगा आहे. या घटनेचा व्हिडिओ इमारतीखाली उभा असलेल्या लोकांनी आपल्या मोबाईलमध्ये शूट केला आहे. शाळकरी मुलगी विकतेय दारूचे ‘फुगे’, देहूरोडमधला व्हिडीओ व्हायरल, पोलीस आहे कुठे? व्हिडिओमध्ये दिसतं, की हा व्यक्तीने घराच्या खिडकीमधून एक कापड बाहेर टाकलं आहे. या कापडाच्या मदतीने तो खाली उतरण्याचा प्रयत्न करत आहेत. यादरम्यान बघ्यांची इमारतीच्या खाली मोठी गर्दी जमली आहे. लोक त्याला असं न करण्याचा सल्ला देत आहेत आणि ओरडाओरड करत आहेत. मात्र, हा व्यक्ती कोणाचंही ऐकायला तयार नाही. इतक्यात अचानक त्याचा तोल गेला आणि पाचव्या मजल्यावरुन कोसळून त्याचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून हे दृश्य विचलित करणारं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या