JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Dasara 2022 : महालक्ष्मी मंदिराला नेसवण्यात आली 16 किलो सोन्याची साडी, पाहा Video

Dasara 2022 : महालक्ष्मी मंदिराला नेसवण्यात आली 16 किलो सोन्याची साडी, पाहा Video

विजयादशमीनिमित्त श्री महालक्ष्मी देवीला 16 किलो सोन्याची साडी नेसवण्यात आली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 5 ऑक्टोबर :  पुण्यातील सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून दरवर्षी मंदिरातील देवीच्या मूर्तीला तब्बल 16 किलो सोन्याची साडी नेसवण्यात येते. विजयादशमीनिमित्त देवीला ही साडी नेसवण्यात आली आहे. यावेळी ही साडी बघण्यासाठी आणि दसऱ्यानिमित्त श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त नवरात्र उत्सव होत असल्याने भाविक मोठ्या प्रमाणात यंदा नवरात्र उत्सव साजरा करत आहेत. देवीला एका भक्ताने ही साडी अर्पण केली आहे. ही साडी तब्बल 16 किलो वजनाची आहे. दसरा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही साडी देवीला नेसवण्यात येते. त्यामुळे श्री महालक्ष्मी देवीचे हे सुवर्णवस्त्रातील रुप पाहण्याकरीता देवीभक्तांकडून गर्दी केली जाते. हेही वाचा :  Dasara 2022 : सोलापूरच्या देवीचे पाकिस्तान कनेक्शन, आजही जपलाय ठेवा! Video सारसबाग येथील श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट, श्री महालक्ष्मी मंदिर तर्फे वर्षातून दोनदा साडी नेसवली जाते. मंदिराचे संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अॅड. प्रताप परदेशी, रमेश कुमार पातोडीया, तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर आदी यावेळी उपस्थित होते. दक्षिण भारतातील कारागिरांनी 20 वर्षांपूर्वी ही सोन्याची साडी साकारली आहे. सुमारे 6 महिने ही साडी तयार करण्याचे काम सुरु होते. आकर्षक नक्षीकाम करुन ही सोन्याची साडी साकारण्यात आली आहे. पुरातन काळापासून दसऱ्याच्या दिवशी सोने लुटण्याची परंपरा आहे आणि त्या परंपरेनुसार सोन्याच्या साडीत देवीच दर्शन व्हावे आणि त्यानिमित्ताने भक्तांना आशीर्वाद मिळावा, हे त्यामागील मुख्य कारण असल्याचे मंदिराचे प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांनी सांगितले. श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्टच्या वतीने आयोजित नवरात्र उत्सवात यंदा ‘कमलपुष्प’ सजावटीमध्ये श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती, श्री महाकाली देवी विराजमान झाल्या आहेत. हेही वाचा :  Dasara 2022: तब्बल 40 फूट उंचीच्या महाकाय रावणाचे होणार दहन, पाहा Video मंदिराचा इतिहास पुण्यातील सारसबाग येथे श्री महालक्ष्मीचे मंदिर अतिशय प्रसिद्ध आहे. हे मंदिर खाजगी मालिकेचे असून अग्रवाल कुटुंबाकडे याची मालकी आहे. या मंदिराची स्थापना 1984 साली झाली. तर मंदिराचे बांधकाम 1972 पासून सलग 12 वर्ष सुरू होते. जवळजवळ 12 वर्ष हे बांधकाम सुरू होते. संगमरवरामध्ये मंदिराचे काम झाले आहे. मंदिरामध्ये असलेली महालक्ष्मीची मूर्ती ही राजस्थानमध्ये बनवली आहे. ही मूर्ती बनवायला देखील 12 वर्षांचा कालावधी लागला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या