JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पुणे सुंदर करण्यासाठी झटतोय चित्रकार, पंतप्रधानांकडूनही मिळाली शबासकी VIDEO

पुणे सुंदर करण्यासाठी झटतोय चित्रकार, पंतप्रधानांकडूनही मिळाली शबासकी VIDEO

Pune : शहरीकरणाच्या रेट्यात पुण्याचं सौंदर्य हरवू नये यासाठी निलेश हा चित्रकार प्रयत्न करतोय. त्यासाठी त्यानं अनोखा मार्ग निवडलाय.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 19 सप्टेंबर :  देशातील सर्वात वेगानं वाढणारं शहर, आयटी आणि ऑटो हब, महाविद्यालीय तरूणांची मोठी पसंती असलेलं शहर म्हणून पुण्याचा लौकिक आहे. स्मार्ट सिटी म्हणून या शहराचा कायापालट करण्याचाही प्रयत्न अलिकडच्या काळात होताना दिसतोय. पुण्याचा विकास आणि विस्तार झपाट्यानं होत असताना शहराच्या सौंदर्याचं काय? हा प्रश्न अनेकदा विचारला जातो. शहरीकरणाच्या रेट्यात पुण्याचं सौंदर्य हरवू नये यासाठी निलेश हा चित्रकार प्रयत्न करतोय. त्यासाठी त्यानं अनोखा मार्ग निवडलाय. पुणे सुंदर करण्याचा प्रयत्न पुण्यातील भिंती या सुंदर अशा पोट्रेटनं रंगवण्याचा प्रकार निलेश आणि अन्य कलाकारांनी सुरू केला आहे. पुणे शहर हे ओपन गॅलरी म्हणून जगासमोर मांडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामधून पुणे शहरातील खासगी आणि सार्वजनिक इमारतींवर 20-20 फुट उंच चित्रं हे कलाकार काढत आहे. 30 फुटांपेक्षा जास्त उंचीची चित्रं काढण्यात हातखंडा असलेला चित्रकार निलेश या प्रोजेक्टमद्दल बोलताना म्हणाला की, ‘पुण्यामध्ये एवढी मोठी चित्रं काढायला मी सुरूवात केली तेव्हा व्यावसायिक आणि सरकारी प्रोजेक्टबद्दलही मला विचारणा झाली. पुण्यासह महाराष्ट्रामध्ये सुरुवातीपासून माझ्या कलेला चांगली दाद मिळाली. माझ्या कलेला व्यवसायिक दृष्टीने देखील खूप फायदा झाला. सध्या पुण्यामध्ये अनेक कलाकाराच्या आहे जे चित्रकलेला एक व्यवसाय म्हणून बघत आहेत. चित्रकलेत करिअर करत आहे. त्यामध्ये भिंतीवर चित्र काढणे ही एक खास कला आहे. मी या क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली आहे. तेव्हा देशात आम्ही चार ते सहा जण या भिंतीवर सुंदर असे पोट्रेट काढू शकत होतो.  हे चित्र काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात संयम आवश्यक असतो.  त्याचबरोबर उंचीचा अंदाज घेऊन योग्य प्रमाणात चित्र काढणं हे देखील आव्हान असतं. एखाद्या 20 फूट उंच भिंतीवर चित्रं काढण्यााठी कॅनव्हास मोठा मिळतो, पण त्याचबरोबर हे चित्र प्रमाणशीर येईल याकडे लक्ष द्यावं लागतं.’ 3 कारणांमुळे लांबली चांदणी चौकातील पूल पाडण्याची डेडलाईन, पाहा VIDEO पंतप्रधानांकडून शबासकी निलेशनं आत्तापर्यंत पुणे, राजस्थान, मुंबई, नेपाळ, केदारनाथ या सारख्या वेगवेगळ्या भागात  पोट्रेट काढले आहेत. त्याच्या पुण्यातील एका पोट्रेटची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’नं देखील दखल घेतली आहे. केदारनाथमध्ये मायनस चार एवढ्या तापमानात पोट्रेट काढल्यामुळे पंतप्रधानांकडूनही शबासकी मिळाल्याचं निलेशनं सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या