पुणे, 09 सप्टेंबर : बारामती मतदार संघात भाजपचा पुढचा खासदार असेल असे भाजपच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान भाजपकडून बारामती (Baramati ajit pawar) मतदार संघाच्या प्रभारी म्हणून निर्मला सितारामन यांची निवड करण्यात आली आहे. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही बारामतीत भाजपचे कमळ फुलवू असे म्हटले आहे. यावर बारामतीचे आमदार अजीत पवार यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपसोबत त्यांनी चंद्रशेखर बानवकुळे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
यावेळी अजीत पवार म्हणाले कि, बारामतीच्या राजकारणाविषयी ते म्हणाले, की बारामतीत माझे काम बोलते. माझ्यापेक्षा कुणी जास्त काम केले असेल तर बारामतीकर त्याचा विचार करतील. कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. असे कितीतरी जण आले आणि गेले 55 वर्षांत. पण बारामतीकरांना माहिती आहे, कुणाचे बटण दाबायचे ते यामुळे त्यांच्याकडे लक्ष न देता आपण आपल्या कामावर लक्ष दिलेले बरं असे पवार म्हणाले.
हे ही वाचा : कॅमेरा दिसताच भडकले इंदुरीकर; अखेर समोर बसलेले धनंजय मुंडे मध्यस्थीसाठी आले अन्…
नवीन अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनाही वाटते आपण काहीतरी करतो. ते बारामतीला आले म्हणून त्यांना प्रसिद्धी मिळाली. इतर कुठे गेले असते तर त्यांना तुम्ही इतकी प्रसिद्धी दिली नसती. तुम्ही इतके संघटनेमध्ये इतके सक्रिय होतात, मग पक्षाने तुम्हाला, तुमच्या पत्नीला उमेदवारी का नाकारली याचे उत्तर द्या, असा सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांना अजित पवार यांनी केला आहे.
कोरोनंतर प्रथमच गणपती मिरवणूक
खूप चांगल्या पद्धतीने आजपर्यंत कार्यक्रम पार पडले आहेत. कोरोनानंतर यंदा मिरवणूक निघत आहे. मंडईपासून सुरू होणाऱ्या मिरवणुकीत आम्ही सहभागी होणार आहोत, असे अजित पवार म्हणाले. तसेच सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. आज विसर्जनाचा दिवस आहे. काहींनी आठव्या, नवव्या दिवशी विसर्जन केले. कोरोना काळात गणेशोत्सव साजरा करता येत नव्हता. यंदाचा गणेशोत्सव सगळ्यांनी अतिशय आनंदाने, चांगल्या प्रकारे पार पाडला, असे अजित पवार म्हणाले.
हे ही वाचा : उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंचा वाद आता कडेलोटापर्यंत, शिवेंद्रराजेंनी कडेलोट करण्याची केली भाषा
दर्शनाला आल्यानंतर प्रत्येकवेळा बाप्पाकडे मागणेच मागावे असे काही नाही. बाप्पा येतो, सर्वांना दर्शन देतो. पांडुरंगाच्या दर्शनाला गेलो किंवा इतर कोणत्या दर्शनाला गेलो, की आमकं साकडं घातलं, तमकं साकडं घातलं, हे असले मला आवडत नाही. दर्शनाला जायचे तर मनमोकळेपणाने जावे. सारखे साकडे घालून कशाला अडचणीत आणायचे, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.