पुणे, 24 सप्टेंबर : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात आज पुणे जिल्ह्यातील तळेगावात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. वेदांता फॉक्सकॉन कंपनी महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यामुळे आदित्य ठाकरेंनी तळेगावात आपल्या भाषणात प्रचंड आक्रोश केला. राज्याचा खरा मुख्यमंत्री नेमका कोण आहे हेच राज्याला अजून समजलेलं नाही, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केला. यावेळी त्यांनी राज्य सरकारला खोके सरकार म्हणून पुन्हा एकदा हिणवलं. “मुख्यमंत्र्यांनी एक-दीड महिन्याआधी विचारलं असतं तर सांगितलं असतं की साहेब त्यांच्याकडेही 50 खोक्के पोहोचवा आणि एकदम ओक्के करा”, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला. “गुजरातबद्दल मी काही चुकीचं बोलणार नाही. कारण त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं. तिकडचे जे उद्योगमंत्री आहेत त्यांनी बघितलं की इथे सरकार बदललं आहे. इथे घटनाबाह्य सरकार बनलं आहे. हे सरकार जे कोसळणार आहे. तुम्ही लिहून घ्या हे सरकार कोसळणार आहे. हे खोके सरकार बनल्यानंतर त्यांनी मौके पर चौका मारला आणि महाराष्ट्रातला प्रकल्प ते गुजरातला घेवून गेले. त्यांचा महाराष्ट्राकडे डोळा होताच. महाराष्ट्रात सरकार बदलतं कधी आणि चांगला प्रकल्प इतर राज्यात घेवून कधी जातो यासाठी ते प्रयत्नशील होते”, असं आदित्य ठाकरे म्हणाले. ( बड्या नेत्यांना घेऊन जाणारं Helicopter Crash, विजेच्या तारेचा स्पर्श होताच…; अंगावर काटा आणणारा Video ) “मी गुजरात आणि केंद्राला दोष देणार नाही. मी दोष देणार तर फक्त नाकर्ते खोके सरकारला दोष देणार. कारण त्यांच्याच नाकर्तेपणामुळे हा प्रोजेक्ट इथून तिथे देतो. ज्या प्रोजेक्टला आपण 10 हजार कोटींची सबसिडी जास्त देतोय, ज्या प्रोजेक्टला आपण वीज, पाणी देतोय, सगळ्या सवलती देतोय, या तळेगावमध्ये काही कमी आहे का? तरुण-तरुणी आहेत, रस्ते आहेत, कॉलेज आहे, ऑटोमोबाईलचा हब आहे. इथून पुणे आणि मुंबईला कनेक्टिवीटी आहे”, असं आदित्य म्हणाले. “त्यांच्या रिपोर्टमध्येसुद्धा महाराष्ट्र नंबर वन असताना आपल्या मुख्यमंत्र्यांना माहितीच नव्हतं की महाराष्ट्र फॉक्सकॉन कोण आहे आणि कुठून आला आणि कधी गेला? त्यांनी एक-दीड महिन्याआधी विचारलं असतं तर सांगितलं असतं की साहेब त्यांच्याकडेही 50 खोक्के पोहोचवा आणि एकदम ओक्के करा. पण या राज्यात चाललंय तरी काय? खरंतर खरा मुख्यमंत्री कोण आहे हे मला आणि जनतेला समजलेलं नाही. खरा मुख्यमंत्री कोण ते राज्याला अजून माहिती नाही. सगळ्यांना सत्य काय आहे ते माहिती आहे”, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.