शेतमजूरच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील तरुणाने जिवे मारण्याची धमकी देत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना
पुणे, 10 सप्टेंबर : पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील शिक्रापुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत शेती आणि फार्महाऊसवर कामाला असणाऱ्या शेतमजूरच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील तरुणाने जिवे मारण्याची धमकी देत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे, हा फॉर्महाऊस भाजपचे नेते गणेश बिडकर यांचा आहे. त्यामुळे प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल गायकवाड असे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. आरोपीला शिक्रापुर पोलिसांनी अटक केली आहे. शिक्रापुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत शेती आणि फार्महाऊसवर विशाल गायकवाड आणि पीडित मुलगी यांचे आईवडील वास्तव्य आणि कामासाठी आहे. हे दोघेही एकमेकांचे नातेवाईक असून पीडित मुलीचे आई-वडील कामानिमित्ताने बाहेर गेले होते. (जी सासरी मृत्युमुखी झाली ती माहेरी जिवंत सापडली, नेमकं काय प्रकरण वाचा) पीडित एकटीच घरी होती. ही संधी साधून आरोपी विशाल गायकवाड याने फॉर्म हाऊसच्या मागच्या मजुर खोल्यांच्या मागे पीडितेवर अत्याचार केला. तसंच, जिवे मारण्याची धमकी दिली. पीडितेचे आई-वडील घरी आले असता तिने हा सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर पीडितेच्या आई-वडिलांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन गाठले आणि आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. या घटनेनंतर शिक्रापूर पोलिसांनी नराधम आरोपीला अटक केली आहे. (नांदेड : जंगलात युवकाची दगडाने ठेचून हत्या; मृतदेहाशेजारी सापडलेल्या वस्तुंमुळे खळबळ) दरम्यान, पुण्यातील भाजपचे नेते गणेश बिडकर यांच्या मालकीची शेती आणि फार्महाऊस असून पीडितेला न्याय मिळून देण्यासाठी दबाव येणार असल्याचा गंभीर आरोप भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाईंनी केला आहे. मात्र, या प्रकरणाबद्दल कोणताही दबाव नसल्याचे स्पष्टीकरण शिक्रापूर पोलिसांनी दिलं आहे.