JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / लॉकडाउनमध्ये 'उडता पुणे', गांजा आणण्यासाठी तरुणांनी 'जे' केलं ते ऐकून पोलीसही हादरले!

लॉकडाउनमध्ये 'उडता पुणे', गांजा आणण्यासाठी तरुणांनी 'जे' केलं ते ऐकून पोलीसही हादरले!

या दोन्ही तरुणांनी मृत असलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्याचे कपडे घातलेले होते. या मृत कर्मचाऱ्याचे कपडे मापात बसत नव्हते म्हणून घरीच…

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 13 एप्रिल : ‘पुणे तिथे काय उणे…’ असं उगाच म्हटलं जात नाही. त्यातच कोरोना व्हायरसचं महासंकट आल्यामुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पुण्यातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे कडकडीत बंद आहे. पण अशाही परिस्थितीत व्यसनाच्या आहारी गेलेले महाभाग काय शक्कल लढवतील याचा नेम नाही. लॉकडाउन असल्यामुळे जीवनावश्यक वस्तू वगळता सर्वच बाजारपेठा बंद आहे. 30 एप्रिलपर्यंत लॉकडाउन असल्यामुळे व्यसनाच्या आहारी गेलेल्या लोकांची पुरते हाल झाले आहे. अशाही परिस्थितीत काही महाभाग वेगवेगळ्या शक्कल लढवून आपली सोय करत आहे. हेही वाचा - ‘तोड़ देंगे तुम्हारे शरीर का कोना कोना, मगर…’, पोलिसांचा हा VIDEO पाहाच अशातच दोन तरुणांनी गांजा घेण्यासाठी जो काही प्रताप केला तो ऐकून पोलीसही हैराण झाले. या पठ्ठ्यांनी चक्क पुणे पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याचे कपडे घालून गांजा आणायला निघाले होते.  पण, पोलिसांच्या तावडीत सापडल्यावर या दोघांचाही नशा चांगलाच उतरला.  खडकवासला पोलिसांनी या दोघांनी अटक केली आहे.

या दोन्ही तरुणांनी मृत असलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्याचे कपडे घातलेले होते. या मृत कर्मचाऱ्याचे कपडे मापात बसत नव्हते म्हणून घरीच ते स्वत:च्या मापात अल्टर करून घेतले होते.  त्याच्या सोबत असलेल्या दुसऱ्या तरुणानेही वाहतूक पोलीस कर्मचारी वापरत असलेल रेडियमचं जॅकेट घातलेलं होतं. हेही वाचा - बादशाहच्या ‘गेंदा फूल’वर या मुलीचा VIDEO VIRAL, जॅकलिनलाही टक्कर देतील अशा अदा मात्र, खडकवासला नाक्यावर बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांना या दोन्ही बहाद्दुरांचा संशय आला. त्यांनी या दोन्ही तरुणांची चौकशी केल्यावर त्यांनी दिलेली उत्तर ऐकून पोलीसही हैराण झाली. या तरुणांनी एका मृत कर्मचाऱ्याचा ड्रेस चोरला होता. तिथेच या दोघांना वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचा रेडियमचा जॅकेटही सापडला होता. या दोन्ही तरुणांसोबत आणखी काही तरुण आहे. त्यांनी सर्वांनी मिळून पैसे गोळा केले होते. या पैशातून हे दोन भामटे मृत कर्मचाऱ्याचा ड्रेस घालून गांजा आणत होते. पण, आज पोलिसांच्या तावडीत सापडल्यानंतर दोघांनी आपल्या कृत्याची उघडपणे कबुली दिली. पोलिसांनी या दोघांनाही अटक केली असून इतर आरोपींचा शोध घेत आहे. संपादन - सचिन साळवे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या