कोरोना थैमानाच्या पार्श्वभूमीवर नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नुकतीच शासकीय मेडिकल रुग्णालयात व इंदिरा गांधी शासकीय कोविड रुग्णालयात भेट दिली.
नागपूर, 25 जुलै: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागपूर शहरात आजपासून (शनिवार) दोन दिवसांचा जनता कर्फ्यु लावण्यात आला आहे. यानिमित्ताने शहरातील सर्वच प्रमुख चौकात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जनता कर्फ्युला यशस्वी करण्यासाठी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, नागपूरचे महापौर संदीप जोशी, पोलीस आयुक्त डॉ. भूषण कुमार उपाध्याय एकत्र आले आहेत. हेही वाचा… कोरोनावरून राडा! रॅपिड अँटिजेन टेस्टला विरोध, कंटेन्मेंट झोनमध्ये तोडफोड आयुक्त तुकाराम मुंढे, नागपूरचे महापौर संदीप जोशी, पोलीस आयुक्त डॉ. भूषण कुमार उपाध्याय यांनी रस्त्यावर उतरून शहराचा विविध भागात पाहणी केली. महापौरांनी यावेळी अनेक वाहनांना अडवून नागरिकांना घरी राहण्याचे आवाहन केले. तसेच पोलीस आयुक्तांनी कायदा व सुरक्षेची पाहणी करून बंदोबस्तावर असलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. तर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही शहरातील विविध भागात जाऊन जनता कर्फ्युच्या काळात नागरिकांनी घरीच राहण्याचे आवाहन केलं. नागरिकांनी जनता कर्फ्युनिमित्त आपल्या जीवनशैलीत बदल करावा, असंही तुकाराम मुंढे यांनी यावेळी सांगितलं. तर पोलीस आयुक्त आणि महापौर यांनीही नागरिकांनी जनता कर्फ्यु उत्स्फूर्तपणे पाळून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. तुकाराम मुंढे यांना नागपूर हायकोर्टाचा दणका नागपूर महापालिकेनं सील केलेल्या एलेक्सिस रुग्णालय प्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे आणि आरोग्य अधिकारी डॉ. गंटावार यांना दणका दिला. एलेक्सिस रुग्णालयावर करण्यात आलेली कारवाई बेकायदा आहे, अशा शब्दांत खंडपीठानं ताशरे ओढले आहेत, तसेच रुग्णालयातील सोनोग्राफी मशिन्सचं सील काढण्यात यावे. ही मशीन त्वरित सोडावी, अन्यथा रुग्णालयाला दिवसाला 50 हजार रुपये महिना नुकसान भरपाई देण्याचेही आदेश खंडपीठानं दिले आहे. हेही वाचा… सुरक्षारक्षकाच्या कपाळाला पिस्तूल लावून तीन कैदी पळाले, जळगावमधील घटना भाजपनं व्यक्त केलं समाधान… नागपूर खंडपीठाच्या या निर्णयावर भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी समाधान व्यक्त केलं आहे. डॉ. गंटावार यांनी यांच्या कारवाई संदर्भात जे आक्षेप घेतले होते ते खरे असल्याचं सिद्ध झाल्याचं नगरसेवक तिवारी यांनी म्हटलं आहे. असं असलं तरी डॉ. गंटावार यांना आयुक्त निलंबित का करत नाही, असा सवाल तिवारी यांनी उपस्थित केला आहे. एकतर डॉ. गंटावार यांना आयुक्त तुकाराम मुंढे यांचा अभय आहे. नाहीतर तुकाराम मुंढे हे देखील या प्रकरणात सहभागी आहेत, असा आरोपही नगरसेवक तिवारी यांनी केला आहे.