पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेनेचे नेते संजय राठोड यांना आपल्या वनमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. पण, दुसरीकडे पूजा चव्हाणची चूलत आजी शांता राठोड यांनी पूजाच्या आई वडिलांवरच गंभीर आरोप केला आहे. प्रकरण दडपण्यासाठी संजय राठोड यांच्याकडून 5 कोटी रुपये घेतले, असा आरोपच शांता राठोड यांनी केला आहे.