JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Bharat Jodo Yatra : 'भारत जोडो'यात्रेत पैसे दिल्याचा आरोप, पूजा भट्टचा नितेश राणेंवर पलटवार

Bharat Jodo Yatra : 'भारत जोडो'यात्रेत पैसे दिल्याचा आरोप, पूजा भट्टचा नितेश राणेंवर पलटवार

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ सध्या चर्चेचा विषय बनली आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत प्रत्येक क्षेत्रातील लोक भेट देऊन पाठींबा देत आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 नोव्हेंबर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ सध्या चर्चेचा विषय बनली आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत प्रत्येक क्षेत्रातील लोक भेट देऊन पाठींबा देत आहेत. यामध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक प्रसिद्ध स्टार्सनीही आपला सहभाग नोंदवला आहे. काही दिवसांपूर्वी हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री पूजा भट्ट राहुल गांधींच्या ही सुद्धा भारत जोडो यात्रेत सहभागी झाली होती.  

यावर भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी टीकात्मक ट्वीट केले होते. भारत जोडो यात्रेला पैसे देऊन सेलेब्रीटी सामील होत असल्याचे त्यांनी वक्तव्य केले होते. दरम्यान यावर आता पूजा भट्टने जोरदार पलटवार केला आहे. नितेश राणे यांच्या ट्वीटला त्यांनी रिट्वीट करत सनसनीत उत्तर दिलं आहे.

हे ही वाचा :  भावना गवळींचे राऊतांविरोधात गंभीर आरोप, महिला आयोगाकडे तक्रार करणार!

संबंधित बातम्या

पूजा भट्टने तिच्या ट्विटमध्ये प्रसिद्ध लेखिका हार्पर लीच्या वाक्याचा संदर्भ घेत नितेश राणेंना उत्तर दिले आहे. ‘तुम्हाला असा विचार करण्याचा नक्कीच अधिकार आहे, तुमच्या मताचा मी पूर्णपणे आदर करतो, परंतु दुसऱ्याना बोलण्याआदी मी स्वत:सोबत आहे का याचा विचार केला पाहिजे, एक गोष्टीचे नक्कीच पालन होत नाही ते म्हणजे माणसाचा असलेला विवेक, अशा शब्दात त्यांनी नितेश राणेंना उत्तर दिले आहे.

जाहिरात

नितेश राणे काय म्हणाले होते

  यात्रेत सहभागी होण्यासाठी पैसे देऊन आणले जात असल्याचा आरोप नितेश राणेंनी केला आहे. “भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने नौंटकी सुरु आहे. यात्रेत १५ मिनिटे चालून राहुल गांधींना पाठिंबा देणारे कलाकार पैसे देऊन आणण्यात आले का?,” असा सवाल नितेश राणेंनी एक स्क्रीनशॉट शेअर करत उपस्थित केला होता.

हे ही वाचा :  निवडणुका गुजरातमध्ये पण सुट्टी महाराष्ट्रात, या 4 जिल्ह्यातल्या नागरिकांना स्पेशल सूट!

जाहिरात

हे सेलिब्रिटीही बनले ‘भारत जोडो यात्रे’चा भाग

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत केवळ पूजा भट्टच नाही तर अनेक सेलेब्रीटी सामील झाले आहेत. अभिनेता अमोल पालेकर, अभिनेत्री रिया सेन, रश्मी देसाई आणि आकांक्षा पुरी यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी भारत जोडो यात्रेला पाठींबा दिला आहे. चित्रपट कलाकारांच्या उपस्थितीने राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला झळाळी आली आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या