JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शेतकऱ्यांना फसवण्यासाठी उभारला 20 लाखांचा कारखाना, अकोला पोलिसांनी हाणून पाडला डाव!

शेतकऱ्यांना फसवण्यासाठी उभारला 20 लाखांचा कारखाना, अकोला पोलिसांनी हाणून पाडला डाव!

बाजारात मोठ्या प्रमाणात प्रमुख खत उत्पादनाचा तुडवडा निर्माण झाला. या संधीचा फ़ायदा घेत अकोल्यात एकाने बनावट खत तयार कारखाना उभा केला.

जाहिरात

बाजारात मोठ्या प्रमाणात प्रमुख खत उत्पादनाचा तुडवडा निर्माण झाला. या संधीचा फ़ायदा घेत अकोल्यात एकाने बनावट खत तयार कारखाना उभा केला.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अकोला, 16 जून : मान्सूनचे आगमन झाले असून शेतकरी आता पेरणीला लागला आहे. पण,  अशातच अकोला पोलिसांच्या (akola) स्थानिक गुन्हे शाखेने बनावट खत तयार करणाऱ्या कारखान्याचा (Police raid counterfeit fertilizer factory) पर्दाफाश केला आहे. अकोला शहरातील एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणात बनावट खतांचा हा कारखाना सुरू होता. पोलिसांनी बनावट खत तयार करणारे साहित्य जप्त केले आहे. ज्याची किंमत 20 लाख एवढी आहे. या प्रकरणी खत तयार करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या मान्सून पेरणी हंगाम सुरू झाला आहे त्यातच बाजारात मोठ्या प्रमाणात प्रमुख खत उत्पादनाचा तुडवडा निर्माण झाला. या संधीचा फ़ायदा घेत अकोल्यात एकाने बनावट खत तयार कारखाना उभा केला. या कारखान्यामधून बनावट खत बनवून बाजारात विक्री केली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांसह शासनाची फसवणूक केली जातं आहे. अशा माहिती अकोल्याचे पोलीस अधिक्षक जी. श्रीधर यांना मिळाली. त्यानंतर लागलीचं स्थानिक गुन्हे शाखेने पथक गठीत केले सोबतचं जिल्हा कृषी विकास अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने अकोल्यातील एमआयडीसी फेज ४ मध्ये सुरु असलेल्या भंगार गोदामात छापा टाकला. ( नुपूर शर्मांना समन्स, रझा अकादमीच्या तक्रारीनंतर मुंबई पोलीस पोहोचले दिल्लीत! ) या दरम्यान, राहुल नामदेव सरोदे (वय ३५ ) हा अवैधरित्या बनावट खताचे उत्पादन करताना मिळुन आला.  डी.ए.पी. खत, आयपीएल-डीएपी खत, महाधन १८:४६:० असा नामवंत खताचे पॅकिंगसाठी वापरण्यात येणारे नवीन प्लास्टिक बारदाना, पॅकिंग मशीन, बनावट रासायनिक खताचा माल, किटकनाशक बॉटल, बनावट हायब्रीड सुमो ग्रानुल्स्, सोडियम सल्फेट’चा कच्चा माल, इम्लसीफायर लिक्वीड, खत बनविण्यासाठी वापरले जाणारे मिक्सर मशीन, निम सीड्स कर्नल ऑईल असा एकत्रित 20 लाख 5 हजार 730 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ( 63 वर्षानंतर भारतीय क्रिकेटमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती, 1959 नंतर पहिल्यांदाच… ) सध्या खरीप हंगाम पेरणीचा कालावधीत मोठ्या प्रमाणावर रासायनिक खताचा तुटवडा असताना बाजारात विक्रीकरिता बनावट खत तयार करण्याचे साहित्य राहुल सरोदे याच्यााकडे आढळून आले आहे. त्याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकोला येथे कलम ४२० भा.द.वि. सह कलम ७, १९, २१ खत नियंत्रण आदेश १९८५, कलम ३,९ अत्यावश्यक वस्तु कायदा १९६८, कलम ९.३ किटकनाशक नियम १९७१ कलम ४,६, ९, १०, १५ किटकनाशक आदेश १९८६ प्रमाणे गुन्हा दाखल केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या